Radhanagari Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Radhanagari Dam Water : राधानगरी धरणात पुरेसा साठा तर काळम्मावाडी धरणाचा पाणीसाठी चिंता व्यक्त करणारा

Water Shortage Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी ही प्रमुख धरणे आहेत यंदा कमी पाऊस झाला असला तरी राधानगरी धरण १०० टक्के भरले.

sandeep Shirguppe

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी ही प्रमुख धरणे आहेत यंदा कमी पाऊस झाला असला तरी राधानगरी धरण १०० टक्के भरले. परंतु काळम्मावाडी धरणाला गळती असल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. यंदा राधानगरी धरणात मागच्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्के पाणीसाठी जादा आहे तर काळम्मावाडी धरणात क्षमतेपेक्षा कमी असल्याने पाणी जपून वापरण्याचा सल्ला पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत आहे.

राधानगरी तालुक्यातील तुळशी प्रकल्पामध्ये मागच्यावर्षीपेक्षा २३ टक्के तर काळम्मावाडी धरणामध्ये १३ टक्के कमी पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राधानगरी धरणात मात्र ९ टक्के जादा साठा आहे.

काळम्मावाडी वगळता राधानगरी व तुळशी ही दोन धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. काळम्मावाडी धरणाला गळती असल्याने ते पूर्ण क्षमतेने भरण्यात आले नाही. दरम्यान काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असाच प्रलंबीत राहिला तर भविष्यात पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून पाटबंधारे विभागाकडून काटेकोर पालन करत उपसाबंदी लावण्यात येत आहे. यामुळे मार्च उजाडला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाण्याचे योग्य नियोजन सुरू असल्याचे दिसून येत आहे. राधानगरी धरणामध्ये गतवर्षी ५१.२६ टक्के साठा होता. सध्या हा साठा ६०.६६ टक्के आहे तर तुळशी धरणामध्ये ८९.७२ टक्के पाणीसाठा होता. सध्या हा साठा ६६.३९ टक्के आहे.

काळम्मावाडी धरणामध्ये गतवर्षी ६४.६० टक्के पाणीसाठा होता. सध्या हा साठा ५१.३६ टक्के आहे. काळम्मावाडी धरणाच्या अखत्यारित कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकतालीत काही तालुक्यांमध्ये पाण्याचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या पाण्याचा वापर खूप काटकसरीने करावा लागणार आहे. यावर्षी काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. आता कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून पाणी पोहोचणार आहे. तालुक्यातील असणारे तुळसी जलाशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते.

यामुळे धामोड नदीकाठाची गावे आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आहेत. तालुक्यातील धरणांमुळे आजवर पाणीबाणी जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT