Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

Sambhajinagar News : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे सोमवार (ता. ४) व मंगळवार (ता. ५) रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत.
Amit Shah
Amit ShahAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे सोमवार (ता. ४) व मंगळवार (ता. ५) रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ते जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

माहितीनुसार, दौऱ्यात सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा यांचे आगमन होऊन ते हॉटेल राम इंटरनॅशनल मध्ये मुक्कामी असतील. मंगळवारी (ता. ५) सकाळी सव्वा दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोल्याकडे रवाना होतील.

Amit Shah
CM Scheme : ‘माझी शाळा’ स्पर्धेत साखरा राज्यात प्रथम

अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने व त्यानंतर हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने क्रांती चौक कडे प्रयाण करतील.

Amit Shah
Onion Export : कांदा निर्यातीचे ‘नोटिफिकेशन’ निघाले

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे त्यांचे प्रयाण होईल. सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी ते जाहीर सभेस उपस्थिती राहून मार्गदर्शन करतील.

सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी पावणेआठ वाजता ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com