Dams Water Kolhapur : शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणी कोल्हापूरच्या धरणांची अशी आहे स्थिती?

Kolhapur Drought : दरम्यान जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Dams Water Kolhapur
Dams Water Kolhapuragrowon

Kolhapur Dams Water Level : मागच्या वर्षी अल् निनोच्या प्रभावामुळे राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर पाटबंधारे विभागाने उपसाबंदीबाबत काही नियमावलीही जाहीर केली आहे. परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा सरासरी समतोल असल्याने यंदा पाणी पुरेल अशी स्थिती आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २७ फेब्रुवारी अखेर काळम्मावाडी धरणात मागील वर्षाच्या तुलनेत अधिक, तर राधानगरी आणि तुळशी धरणात समतोल पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी तीन-साडेतीन महिन्यांत होणाऱ्या पाणी वापराचा लेखाजोखा पाहता या तीनही धरणांच्या लाभक्षेत्रात पाणी कमतरतेची शक्यता नाही.

शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणी राहील. अशीच सद्यस्थिती समोर आली आहे, मात्र परिस्थिती पाहता काटकसरीने पाणी वापरणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा केवळ ३०० एमसीएफटी, तर तुळशीत १०० एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे. काळम्मावाडीत मात्र गतवर्षपिक्षा दोन टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. या धरणात गतवर्षीपेक्षा यंदा चार टीएमसीने अधिक पाणीसाठा केला. यंदा २३ टीएमसी, तर गतवर्षी गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम सुरू करण्याच्या नियोजनातून केवळ १९ टीएमसी पाणीसाठा केला होता.

Dams Water Kolhapur
Kolhapur Drought : कोल्हापूरच्या अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा गडध, शेकडो हेक्टर ऊस पीक धोक्यात

यंदा कदाचित एप्रिल महिन्यात गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम सुरू झाल्यास, राधानगरी धरणातील पाण्याऐवजी काळम्मावाडीच्या पाण्याचा अधिक वापर एप्रिल व मे महिन्यात केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यात काळम्मावाडी वगळता राधानगरी व तुळशी धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडीत पूर्ण क्षमतेपेक्षा अडीच टीएमसीने कमी पाणीसाठा ठेवण्यात आला.

काळम्मावाडी धरण गळती काढण्याच्या कामाची निविदा निघाल्याने, यंदा एप्रिल अखेरीपर्यंत कामाला गती मिळणार आहे. काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार धरणातील पाणीसाठा कमी करण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर दूधगंगा आणि पंचगंगा नदी खोऱ्यात होणार आहे.

पाणीसाठा दोन टीएमसीने जास्त

यंदा राधानगरीसह काळम्मावाडी व तुळशी धरणात मिळून जवळपास २० टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा १८ टीएमसी म्हणजे दोन टीएमसीने कमी होता. यातून संभाव्य पाणी तुटवड्याचे संकट आज तरी टळल्याचे स्पष्ट होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com