Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Production : मळीपासून खत निर्मितीला चालना देण्याच्या हालचाली

Sugarcane Molasses : साखर उद्योगात मुबलक प्रमाणात मळी उपलब्ध होत आहे. मात्र मळीपासून पालाश खताची निर्मितीची क्षमता अद्यापही पूर्ण वापरली गेलेली नाही.

मनोज कापडे

Pune News : साखर उद्योगात मुबलक प्रमाणात मळी उपलब्ध होत आहे. मात्र मळीपासून पालाश खताची निर्मितीची क्षमता अद्यापही पूर्ण वापरली गेलेली नाही. त्यामुळे मळीतील पालाश निर्मितीला चालना देण्यासाठी खत उद्योगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

देशातील नामवंत खत निर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘दि फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एफएआय) मळीआधारित खत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

येत्या २८ रोजी पुण्याच्या दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स असोसिएशनमध्ये (डीएसटीए) होणाऱ्या सकाळी ९ ते ५ या वेळेत होत असलेल्या या चर्चासत्रात खत उद्योगातील निर्माते, विपणन क्षेत्रातील प्रतिनिधी, आयातदार व निर्यातदार, वितरक, संशोधन, धोरणकर्ते सहभागी होत आहेत.

जमीन सुपीकतेमधील नैसर्गिक पालाशयुक्त खताचे महत्त्व आणि देशातील पालाशयुक्त समतोल वापराची स्थिती, पालाशयुक्त खतांची निर्मिती-विपणन यातील संधी व आव्हाने, स्पेन्टवॉशपासून खताची निर्मिती, पालाशयुक्त खते आणि कृषी विभागाचे नियम, खतांच्या संशोधनाची वाटचाल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर या चर्चासत्रात मते मांडली जाणार आहेत.

‘एफएआय’चे प्रांतिक कार्यकारी अधिकारी एस. पी. शेटे यांच्याकडून सध्या या चर्चासत्राची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, एफएआयचे संचालक (विपणन) नरेश प्रसाद यांच्यासह या चर्चासत्रात आर. के. अॅग्रोचे संचालक प्रकाश कारखेले, राघवेंद्र फर्टिलायझर्सचे अध्यक्ष नरेंद्र पंडितराव, मालती फाइन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोहन डोंगरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, वासुमित्र लाइफ एनर्जीच्या संचालिका डॉ. हेमांगी जांभेकर व मुंबईतील प्रादेशिक खत नियंत्रण प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. सी. एम. माथवन सहभागी होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT