Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Day: शेतीत तरूणांची सकात्मक पेरणी

Youth in Farming: शेती हा विविध समस्यांनी चहूबाजूने घेरलेला व्यवसाय. नानाविध कारणांमुळे शेतीचे चित्र नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणून शेतीचा वारसा समृद्ध करण्यासाठी नवी तरुणाई पुढे येत आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News: शेती हा विविध समस्यांनी चहूबाजूने घेरलेला व्यवसाय. नानाविध कारणांमुळे शेतीचे चित्र नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणून शेतीचा वारसा समृद्ध करण्यासाठी नवी तरुणाई पुढे येत आहे. शास्त्रीय संकल्पना व अर्थकारण अभ्यासून सकारात्मकतेची पेरणी करत आहे.

ग्रामीण अर्थकारणाशी निगडित असलेल्या शेतीत सध्या अपेक्षित उत्पन्न नसल्याने संधीच्या शोधात शहरी भागात स्थलांतर वाढले आहे. ‘नोकरी हवी; शेती नको रे बाबा’ असेच चहूबाजूला ऐकायला मिळते. असे असताना फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, शेतीमाल विपणन व कृषिपूरक उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरुणांनी नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून शेतीला नवा चेहरा देत आहेत.

उत्पादन ते विक्री यात अभ्यास केल्यानेच संधी

नाशिक जिल्ह्यातील चास (ता. सिन्नर) योगेश शिवाजी ढाकणे सांगतो, शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. तर ते एक सामाजिक व समृद्ध करणारे क्षेत्र आहे. आजच्या तरुणांनी शेतीकडे केवळ परंपरागत व्यवसाय म्हणून पाहता नावीन्य आणि संधी शोधाव्यात. कृषी पदवीचे शिक्षण घेऊन नोकरी केली. मात्र नोकरीत समाधान नसल्याने शेतीकडे परतलो. आधुनिक तंत्रज्ञान आणि संधी यांचा मेळ घालून शेतीची वाट सुकर केली आहे. प्रामुख्याने पारंपरिक पिकांबरोबरच ब्रोकोली, झुकिनीसारखी विदेशी भाजीपाला पिके याशिवाय झेंडू, शेवंतीची फुलशेती अभ्यासून बाजारपेठ मिळविली आहे. उत्पादन ते विक्री अभ्यासल्याने संधी निर्माण झाल्याचे तो आवर्जून सांगतो.

प्रयोगशीलतेमुळे ओळखली जाणारी तरुणाई

‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष हे तरुणाईचे आदर्श आहेतच. शिवाय राज्यात फणसशेतीत मिथिलेश देसाई, शेतीमाल प्रक्रियेत रोहन उरसळ, अंजीर शेतीत समीर डोंबे, ॲपल बेर व ड्रॅगन फळ शेतीत महेश आजबे, मिरचीमध्ये सतीश गिरसावळे, केळी उत्पादनात अभिजित भांगे, द्राक्ष उत्पादनात गणेश मोरे, बापू साळुंखे, राहुल रसाळ, फुलशेतीत गणेश वाघ, सेंद्रिय शेतीत सचिन येवले, शेतीमाल निर्यातीत लक्ष्मण सावळकर, दुग्धव्यवसायात श्रद्धा ढवण अशी काही प्रातिनिधिक नावे घेता येईल. शेतीत अभ्यासपूर्ण कामकाज करून मॉडेलची उभारणी करणारी ही तरुणाई यासह अनेकजण राज्य व देशातील शेतीक्षेत्रासमोर आदर्श आहेत.

शेती क्षेत्र बदलत असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण शेतकरी आता पुढे येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीत नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतीत तरुणाई येत आहे. कृषी क्षेत्रात तरुणाईचे महत्त्व ओळखून कृषी विभागाने युवा शेतकरी पुरस्कार सुरू केले आहेत.
रफिक नाईकवाडी, संचालक, कृषी विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग
बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रातील अनेक तरुण आता एकमेकांना नवीन प्रयोगातून मदत करताना दिसत आहेत. शेतीतील नवी सकारात्मकता उद्योग, स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रम करून शेती क्षेत्राला नवीन ऊर्जा देत आहेत.
रितेश पोपळघट, संचालक-द फार्म
शेतीत करियर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. उत्पादन, प्रकिया आणि व्यवसाय केला तर नक्कीच शेतकरी शाश्वत शेतीत उत्पन्न कमवू शकतो. मात्र स्वतः राबून व्यवसायाप्रमाणे वाटचाल असावी.
ऋषिकेश कांडेकर, प्रयोगशील युवा शेतकरी, लाखलगाव, ता. जि. नाशिक
शेतीत भांडवली गुंतवणूक वाढविण्यासह यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानासाठी सरकार पुढाकार घेत आहे. यामुळे तरुण शेतकरी शेतीत येतील. शेती करताना याचा फायदा होऊन नवी तरुणाई शेतीत बदल घडवतील, ही सरकारची भावना आहे.
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT