CM Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : विरोधकांकडे आरोप, शिव्याशाप; तर आमच्याकडे काम आहे

CM Eknath Shinde : विरोधकांकडे काहीही नाही. त्यांच्याकडे आरोप, शिव्याशाप आहे, तर आमच्याकडे काम आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लावला.

Team Agrowon

Nashik News : ‘‘गेल्या दोन वर्षांत महायुती सरकारने केलेले काम सर्वांसमोर आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे सर्व कामांना स्पीड ब्रेकर होता. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही महायुती म्हणून काम सुरू केले, त्या माध्यमातून अनेक प्रकल्प व योजना सुरू झाल्या.

यामध्ये नंतर अजित पवार हेदेखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून विकासासाठी सोबत आले. आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे. विरोधकांकडे काहीही नाही. त्यांच्याकडे आरोप, शिव्याशाप आहे, तर आमच्याकडे काम आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लावला.

मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी (ता. ८) पक्ष बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करीत आहेत.

राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ, तरुण व महिलांसाठी असे विविध निर्णय घेतले, ते निर्णय आजवर कुणीही घेतले नव्हते, असा दावा त्यांनी केला. मंदिरे, गडकोट किल्ले यांचेही संवर्धन करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे,’’ असा उल्लेख त्यांनी या वेळी केला.

‘‘देशाला महासत्तेकडे नेण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. जगात सर्वत्र देशाचा नावलौकिक आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललो आहे. आम्ही घरात बसून काम करीत नाही,’’ असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. ‘‘खिचडी चोर, पत्रा चोर यांच्याबद्दल काय बोलू, त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील,’’ असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

शांतिगिरी महाराजांच्या मनधरणीचा प्रयत्न कायम

उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी मागे घ्यावी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री दादा भुसे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. मात्र शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली भूमिका कायम ठेवली.

त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता महायुतीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रस्ताव मांडला. शांतिगिरी महाराजांशी मी स्वतः बोललो आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा त्यांचे धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. तुम्ही आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT