Farmer Prosperity : शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे : शांतिगिरी महाराज

Farmer Updates : शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. कारखान्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.
साखर कारखाना
साखर कारखाना Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांची अर्थवाहिनी असलेलानाशिक सहकारी साखर कारखानापरिसराचे वैभव आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. कारखान्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

तब्बल नऊ वर्षे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन मंगळवारी (ता. २४) महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून झाला. त्या वेळी ते बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गोडसे होते. या वेळी संचालक बी. टी. कडलग, सागर गोडसे, नामदेव कडलग, शेरझाद बाबा पटेल, विलास आडके, रमेश गायकर, निवृत्तीनाथ महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश गाढवे, विश्वस्त नारायण मुठाळ, गणपत गायधनी, सोमनाथ सानप, विष्णुपंत गायखे, मोतीराम जाधव, कैलास टिळे, अशोक खालकर, रमेश औटे, अशोक जाधव, पोलिस पाटील सुनील गायधनी, नामदेव गायधनी, रामकृष्ण झाडे, कैलास भांगरे, विलास गायधनी, लकी ढोकणे, विष्णुपंत गोडसे, रामभाऊ चौधरी आदींसह ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखर कारखाना
Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेंर्तग ८६ लाख शेतकऱ्यांना १७२० कोटींचे उद्या होणार वितरण

शांतिगिरी महाराज म्हणाले, की ‘नासाका’ सुरू झाल्यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, ऊसतोड मजूर या सर्वांच्या हाताला काम मिळाले आहे. खऱ्या अर्थाने खासदार गोडसे यांनी कारखाना सुरू करण्याचे जे शिवधनुष्य उचललेले आहे ते निश्चितच फलदायी ठरणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

साखर कारखाना
Bacchu Kadu : शेतकरी, शहिदांच्या सन्मानार्थ बच्चू कडूंचा २९ ला अयोध्या दौरा

खासदार गोडसे म्हणाले, की कारखाना सुरू करण्यामागे तीन हेतू असून त्यात शेतकरी व कामगार हित व तद्नंतर कंपनी असा प्राधान्यक्रम आहे. मागील हंगामात ६८ हजार टन उसाचे गाळप झाले असले तरी यंदा कारखान्याने सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवत २.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार व ऊसतोडणी कामगार यांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व पळसेच्या प्रिया गायधनी, नाणेगावचे अशोक आडके, शिंदेचे गोरख जाधव, वडगाव पिंगळाचे शेवंता मुठाळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com