Indian Politics : भाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून ‘माकप’ची माघार

Loksabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले होते. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडला.
Politics
PoliticsAgrowon
Published on
Updated on

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले होते. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडला. त्यामुळे या मतदार संघातून इच्छुक असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सुरगाण्याचे माजी आमदार जीव पांडू गावित यांनी ही जागा आपल्या पक्षासाठी मागितली होती.

Politics
Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

त्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र भारताच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही संघराज्य प्रणालीला आधारभूत असलेले संविधान बदलण्याचे उद्दिष्ट राबविणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघातून ‘माकप’ माघार घेत आहे, अशी घोषणा ‘माकप’चे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की माकपचे स्वतंत्र सामर्थ्य वाढवणे आणि लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘माकप’चे उमेदवार जे. पी. गावित यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले. दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीने माकप उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी पक्षाची मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रयत्न केले होते.

Politics
Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी ‘माकप’ची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत ‘माकप’ने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. जनतेच्या संभाव्य कौलाचा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी ‘माकप’ने दिंडोरी मतदार संघातील गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही डॉ. नारकर यांनी म्हटले आहे.

जळगावातील भेटीत गवितांची मनधरणी

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेऊन महाविकास आघाडीतील मतभेद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात ‘माकप’च्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आला. अखेर दोन दिवसांपूर्वी गावित यांनी पवार यांची जळगाव येथे भेट घेतली. या वेळी बंद दाराआड चर्चा झाली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मदतीच्या शब्दावर गावित यांच्याशी तडजोड घडवून आणल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com