Gopinath Munde Anudan Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Gopinath Munde Anudan Yojana : अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांना मिळणार ५ लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान

Sugarcane Cutting Workers Scheme : राज्य सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना' राबवण्यासाठी गुरुवारी (ता.१०) मंजूरी दिली आहे.

Team Agrowon

Maharashtra Government Scheme : राज्य सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना' राबवण्यासाठी गुरुवारी (ता.१०) मंजूरी दिली आहे. उसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांचा अपघात मृत्यू झाला वा अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या पण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम झोपडी व बैलजोडी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यात ऊस तोडणी व वाहतुक्क करतांना होणारे अपघात, सर्पदंश विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अपघातात ऊसतोड कामगार मुकादम यांचा मृत्यू होतो वा अपंगत्व येतं. अशावेळी संबंधित व्यक्तिच्या अपघातामुळे कुटुंबाचं उत्पन्न बंद होते.

त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम, त्यांचे झोपडी आणि बैलजोडी यांचा अपघात विमा उतरवण्याची योजना राबवण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत ४ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेला मान्यता दिली आहे.

आर्थिक मदत दिली जाणार ?

आग लागून झोपडी आणि सामग्रीचं नुकसान झालं तर १० हजार रुपये, वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, अपघातात अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, अपघातात वैद्यकीय खर्च ५० हजार रुपये, लहान बैलजोडी मृत्यू वा अपंगत्वासाठी ७५ हजार रुपये आणि अपघातात मोठ्या बैलजोडीचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान या योजनेतून देण्यात येणार आहेत.

आर्थिक मदत मिळणार

पण ही उस गाळप हंगामाच्या कालावधीसाठीच लागू राहणार आहे. यामध्ये रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हातळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, ऊंचावरून पडलेला मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांचा हल्ला, चावामुळे जखमी वा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल वा अन्य कोणतेही अपघात असेल तर या योजनेतून लाभ मिळणार आहे.

आर्थिक मदत मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, योजनेच्या पूर्वीचं अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या, जाणीवपूर्वक स्वतला जखमी करून, गुन्हाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांचे सेवन करून झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरातर्गत रक्तस्त्राव, बैलगाडा वा मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध वा सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून यासाठी आर्थिक लाभ मिळणार नाही. तसेच अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला तर मात्र या योजनेला लाभार्थी कुटुंब पात्र राहणार नाही.

सानुग्रह अनुदाला पात्र कोण?

१) मृत कामगाराची पत्नी/पती

२) मृत कामगाराची अविवाहित मुलगी

३) मृत कामगाराची आई

४) मृत कामगाराचा मुलगा

५) मृत कामगाराचे वडील

६) मृत कामगाराची सून

७) अन्य कायदेशीर वारसदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT