Gopinath Munde Scheme
Gopinath Munde Schemeagrowon

Gopinath Munde Scheme : शेतकरी पत्नीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार दोन लाखांची मदत, काय आहे योजना

Farmers Scheme : प्रसूती (बाळंतपणात) दरम्यान शेतकरी पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्याचे ठरवलं आहे.
Published on

Agriculture News : राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. अपघाती मृत्यूसह अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना आर्थीक मदत या योजनेतून मिळत असते. राज्य सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून महिलांनाही महत्वाचे स्थान देण्याचे ठरवलं आहे. प्रसूती (बाळंतपणात) दरम्यान शेतकरी पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्याचे ठरवलं आहे. मागील सहा-सात महिन्यात जिल्हास्तरावर एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. शेतकऱ्याच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्यास पतीला दोन लाख रुपये मिळतात. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून अर्ज करावा लागतो.

असा करावा प्रस्ताव दाखल...

ज्या शेतकऱ्याचा अपघात घडला आहे त्या शेतकऱ्याने ३० दिवसाच्या आत आपला ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र या कागदपत्रांचा संच.

तसेच पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेला अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल ही कागदपत्रे घेऊन संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून परिपूर्ण प्रस्ताव हवा.

Gopinath Munde Scheme
Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

यांना मिळतो योजनेचा लाभ

पाण्यात बुडून, अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, विचूदेश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात व जनावर चावल्याने मृत्यू किंवा जखमी झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळण्यास पात्र आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com