Farmer Accident Insurance : सव्वाशे शेतकऱ्यांच्या वारसांना अपघात विमा

Agriculture Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान देण्यात येते.
Gopinath Munde accident insurance
Gopinath Munde accident insuranceAgrowon
Published on
Updated on

Jalana News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान देण्यात येते. २०२३ - २४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना २ कोटी ४६ लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघाताने दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय व एक हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना २ लाख, रुपयांची मदत दिली जाते. तसेच अपघाताने अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

Gopinath Munde accident insurance
Farmers Accident Insurance : शेतकरी अपघात विम्याची २०९ प्रकरणे मंजूर

चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे २ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मदत देण्यात आली आहे. राज्यात २०१५-१६ पर्यंत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली गेली.

परंतु या योजनेत अनेक त्रुटी होत्या. विमा कंपन्यांकडून दावे निकाली काढण्यात दिरंगाई केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. २०२३ पासून सरकारने सानुग्रह अनुदान तत्त्वावर योजना राबण्याचा निर्णय घेतला.

Gopinath Munde accident insurance
Farmers Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान २० शेतकऱ्यांना मजूर

...या कारणाने मृत्यू झाल्यास अर्ज करू शकतात

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांमुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणताही अपघात.

शेतकरी कुटुंबातील सदस्याचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आले असल्यास संबंधित व्यक्तीचा राज्य सरकारकडून विमा काढलेला असतो. त्यांच्या कुटुंबीयांनी विहित पद्धतीत अर्ज केला असल्यास संबंधित रक्कम मदत सानुग्रह स्वरूपात त्यांना वितरित केली जाते.
—गहिनीनाथ कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com