Dr. Indra Mani  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : आव्हाने स्वीकारणे शास्त्रज्ञाचे काम : डॉ. मणी

Dr. Indra Mani : कृषीत येणाऱ्या आव्हानाची उत्तर द्यावे लागतीलच असे परखड मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपल्या संशोधनाची दिशा ठरवणार नाही तो कृषी शास्त्रज्ञ कसा म्हणावा. हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्याला जमीन, पीक, उत्पादकता वाढ या सर्व विषयांवर समाधान हवंय. तो तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे पाहतोय. आव्हाने स्वीकारणे हे शास्त्रज्ञाचे काम. त्यामुळे कृषीत येणाऱ्या आव्हानाची उत्तर द्यावे लागतीलच असे परखड मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

विभागीय कृषी विस्तार आणि सल्लागार समितीची ७५ वी बैठक शुक्रवारी (ता. १४) राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीच्या उद्‌घाटन सत्रात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. मणी बोलत होते.

या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बैठकीला विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, विस्तार कृषी विद्यावेत्ता उपस्थित होते.

पुनरुत्पादक शेती झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे योग्य ठरणार नाही. सेंद्रिय कर्ब वाढ, उत्पादन खर्च नियंत्रण व उत्पन्न वाढ यासाठी अभ्यास करून शिफारशी करण्याची गरज आहे.
डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर
प्रश्नांवर मनुष्यबळ कमी हे उत्तर सांगून चालणार नाही. संशोधन शेतकऱ्यांच्या सहयोगातून करणे स्वीकारावे लागेल. शेतकरी करीत असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रयोगावर एकत्रितपणे अभ्यास करून शिफारशी करता येतील. प्रात्यक्षिकाकडून प्रयोग आणि शिफारशीकडे पद्धत अवलंबल्यास वेळ श्रम वाचतील.
डॉ. हरिहर कौसडीकर,संशोधन संचालक, महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणे
शिफारस केलेले वाण, तंत्रज्ञानाचा परिणाम काय हे जाणून घ्यावे लागेल. नवीन विशिष्ट वाणाच्या तुटवड्यावर पर्याय शोधावे लागतील. एक दिवस बळीराजा उपक्रमासाठी कृषीचा सहभाग वाढवावा लागेल. केवळ चर्चा करून भागणार नाही तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी ठोस पावले उचलावे लागतील.
डॉ. धर्मराज गोखले, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि

कृषी संलग्न विभागाची दांडी

या वेळी झालेल्या ७५ व्या कृषी संशोधन सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थिती अपेक्षित असलेल्या सामाजिक वनीकरण, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि सिंचन या कृषी निगडित महत्त्वाच्या विभागाची अनुपस्थिती राहिली. नियोजनानुसार मध्य महाराष्ट्र पठार विभागात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह धुळे बुलडाणा व जळगाव हे तीनही जिल्हे येतात. या विभागासाठी या बैठकीचे आयोजन असते. मात्र या तिन्ही जिल्ह्यांतील कोणताही विभाग बैठकीसाठी उपस्थित नव्हता हे विशेष.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT