Kolhapur Flood : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला यंदा महापुराची चिंता नाही पण धरणातील पाणी... अभ्यासक काय म्हणतात

IMD Alert : यंदा उन्हाळा तीव्र झाला. त्यामुळे पाऊसमानही वाढेल, असा अंदाज हवामान विभागासह तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Weather Update : कोयना, चांदोली व राधानगरी धरणात अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे कितीही दमदार पाऊस पडला तरी धरणे भरण्यासाठी ऑगस्टअखेर होईल. त्यानंतर पावसाचा जोरही कमी होतो. धरणविरहित क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता नदीपात्रात नैसर्गिकरित्या असते. त्यामुळे यंदा कितीही पाऊस वाढल्यास नैसर्गिक पूर येईल; पण महापुराची चिंता नाही.फक्त धरणातील पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल,’’

असे पाटबंधारे विभागाचे धरण पाणी अभ्यासक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दै. ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

यंदा उन्हाळा तीव्र झाला. त्यामुळे पाऊसमानही वाढेल, असा अंदाज हवामान विभागासह तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास महापुराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाण यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘अलमट्टी धरण व हिप्परगी धरणातील पाणीसाठा नियोजनापेक्षा जास्त असणे यातच कोयना, धरण, चांदोली, राधानगरी धरणात उन्हाळ्यातच जास्त पाणीसाठा असेल. जुलैमध्ये पाऊस वाढल्यास धरणे तातडीने भरतात. कोयनेतून पाणी सोडले जाते.

अलमट्टी व हिप्परगीमधून पाणी अपेक्षित प्रमाणात सोडले नसल्यास कोयना धरणातून कृष्णेत येणारे पाणी अलमट्टीकडे सहजपणे जात नाही. ते पाणी महाराष्ट्राच्या सीमेवर अडते. यात चांदोली, राधानगरी धरणाची पाणी सोडल्यानंतरही वारणा व पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीला मिळते. त्या पाण्याची फुग तयार होते आणि कोल्हापूर, सांगलीत महापुराचे संकट ओढावते. असा अनुभव २०१९ व २०२१ चा होता.

Kolhapur Flood
Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात इतका पाणीसाठी शिल्लक, सांगलीकरांना पाणी मिळणार?

’’ते म्हणाले, ‘‘ दोन वर्षांत केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीनुसार उन्हाळ्यात कोयना, राधानगरी, चांदोली धरणातील पाणी किमान ठेवण्याची अंमलबजावणी केली. परिणामी गतवर्षी पूर आला, पण महापूर नाही. यंदाही तीच अंमलबजावणी झाली. तरी अलमट्टी व हिप्परगी धरणातील विसर्गही केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीनुसार होणे यावरही लक्ष ठेवून लागेल.’’

धरणाचे नाव क्षमता सध्याचा साठा

कोयना धरण १०५ टीएमसी १० टीएमसी

चांदोली धरण ३७ टीएमसी ३ टीएमसी

राधानगरी धरण ७ टीएमसी २ टीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com