Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Act : नवीन कृषीनिविष्ठा कायदा रद्द कर

Latest Agriculture News : कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरसे कायदे असताना राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे.

Team Agrowon

Sangli News : कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरसे कायदे असताना राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे. त्यातील जाचक अटींमुळे कृषी निविष्‍ठा विक्री करणेही मुश्कील आहे. त्यामुळे संभाव्य विधेयक रद्द करण्याची मागणी सांगली जिल्हा असोसिएशनने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, की संभाव्य विधेयकाविरोधात आवाज उठवण्यासाठी २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळणार आहेत. राज्यातील खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते स्वतः तयार करीत नाहीत. विविध कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे सीलबंद पॅकेट ते विकतात.

त्या पाकिटांमधून संबंधित कंपनीने सदोष उत्पादन घातले असेल किंवा अनावधनाने काही दूषित घटक मिश्रित झाले असतील तर त्याबाबत विक्रेत्यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही. तसे झाल्यास कायदेशीर कारवाईसंदर्भात प्रचलीत कायदे आहेत. तरीही राज्य शासन नवीन विधेयक आणत आहे. त्यात विक्रेत्यांना सरसकट दोषी धरण्यात येणार आहे.

त्यासाठी निविष्ठा विक्रेत्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच तीन महिने त्याला तुरुंगात बसावे लागेल, अशी तरतूद आहे. तसेच पोलिस यंत्रणेलाही कारवाईचे आदेश दिले आहेत. स्थानिक पातळीवर एखाद्या वादातून एखाद्या विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत अडविण्यात येण्याचा धोका आहे.

त्यामुळे संभाव्य विधेयक रद्द करावे, अशी मागणी खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंग नाईक यांच्याकडेही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी अविनाश पाटील, संजय निल्लावार, राजेंद्र पाटील, रवी पेटकर, विजय कोळेकर, ‘माफदा’चे संचालक प्रकाश माळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT