Solapur News : कृषी निविष्ठा विक्री करणारे दुकानदार हे मूळचे शेतकरी कुटुंबातीलच असतात. त्यामुळे आपल्या भागातील जमिनीचा पोत, पावसाचे प्रमाण तसेच अन्य सर्व बाबींची अनुभवासह त्यांच्याकडे संपूर्ण माहिती असते.
त्यामुळे कोणत्या काळात हवामानाला अनुसरून कोणते पीक घ्यावे, खते, कीटकनाशके कोणती व किती प्रमाणात वापरावीत, याची संपूर्ण माहिती विक्रेत्यांना असते. ती माहिती त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन स्वरूपात द्यावी व शेतकऱ्यांचे सल्लागार व्हावे, अशी अपेक्षा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. ६) येथे केली.
येथील विठ्ठल पॕलेसमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, महाराष्ट्र फर्टिलायझर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, संघटनेचे महासचिव विपिन कासलीवाल, कृषी संचालक विकास पाटील या वेळी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाले, की काही कंपन्या किंवा डीलर्स हे दुकानदारांना विविध खते, बियाणे किंवा विशिष्ट कीटकनाशकांच्या विक्रीसाठी लिंकिंग करण्याची सक्ती करत असतात. या बाबत अनेक संघटना व दुकानदारांनी गुप्तपणे तक्रारी केलेल्या आहेत.
आता लिंकिंगचा दबाव दुकानदारांनी पूर्णपणे झुगारून देण्याची व शासनाचेही मित्र होण्याची गरज आहे. तसेच लिंकिंगच्या विरोधात कुठल्याही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तक्रार केल्यास त्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवून संबंधित डीलर्स किंवा कंपनी विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल व त्याचा कोणताही त्रास संबंधित विक्रेत्यास होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, हनुमंतराव पवार, कृष्णा माळी यांसह संघटनेचे पदाधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.