Ground Water Conservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Conservation : शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजलाचे संवर्धन करणारे गाव : मोहा

Team Agrowon

Water Conservation : जमिनीवर वाहणारे पाणी, धरणांसह विविध बंधाऱ्यांमध्ये साठवलेले पाणी किंवा कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या पाणी वापर संस्था काही गावांमध्ये उभ्या राहिल्या आहेत. तसेच शेतीला मोजून, मीटरद्वारे पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचे गावही आपल्याला माहीत आहे.

मात्र डोळ्याला न दिसणाऱ्या भूजलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी काही गावेही महाराष्ट्रात आहेत. ती गावे भूजलाचा ताळेबंद मांडून नियोजन करतात. त्यातून समृद्धी मिळवतात. बीड जिल्ह्यातील मोहा (ता. परळी) हे गाव त्यातील एक.

बालाघाटच्या डोंगररांगांनी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण अशा तिन्ही बाजूंनी वेढलेले ६००० लोकसंख्येचे गाव. क्षेत्र १९७० हेक्टर आणि ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून. वार्षिक पर्जन्यमान ५८१ मि.मी. आणि गावाला वळसा घालून जाणारी एक नदी. १९७० पूर्वी दाट आमराया आणि भरपूर झाडांचे गाव. ७२ च्या दुष्काळात गावतळे तयार झाले. पाण्याची नियमित उपलब्धता वाढल्यावर जे होते तेच झाले.

खटाखट आमराया तुटून ऊस उभा राहिला. मुळात पर्जन्यमान कमी, तेही पुढे अनियमित होत जाणं आणि लोकसंख्या वाढ अशा काही गोष्टींमुळे गावात लवकरच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. इतके की पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यालाही गाव महाग झाला.

या पार्श्‍वभूमीवर २०१० च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर यांनी युवकांना उजाड डोंगर, पाऊस, माती, पाणी यासंबंधी काही शास्त्रीय माहिती दिली. या धडपडणाऱ्या ३० ते ४० युवकांना पुण्यातील एम.के.सी.एल. कंपनीच्या टीमने गावाला भेट देत माहिती घेत पुढील वाटचालीसाठी युवकांना मार्गदर्शन केले.

पाणी विशेषतः भूजल संवर्धनाच्या प्रशिक्षणासाठी खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्रात पाठवले. गावाला एक पर्जन्यमापकही भेट दिले. तेव्हापासूनच गावात पाऊस मोजणे सुरू झाले. २०१२ ला खरपुडीत ॲक्वाडॅम संस्थेच्या तज्ज्ञांनी या युवकांना प्रशिक्षण दिले.

त्यात पाणलोट क्षेत्रात करायची कामे, जमिनीखालील खडकांची रचना व त्यांचे भूजलाशी संबंध, पाणी मुरणे, अपधाव (Runoff) मोजणे, गावाचा टोपोशिट म्हणजेच उंचसखलपणाचा नकाशा कसा वाचायचा, त्याचा पाणलोट क्षेत्र विकास व भूजलासंबंधी कसा उपयोग करून घ्यायचा आणि सर्व कामांची शास्त्रशुद्धता कशी राखायची हे शिकवले. गावी येताच या युवकांनी गावातील विहिरी आणि बोअरवेलचे सर्वेक्षण केले.

त्यांची ठिकाणे ‘गुगल मॅप’वर नोंदवली. त्यांना क्रमांक देऊन प्रत्येक विहिरीचा व्यास, खोली व पाणी पातळी, महत्त्वाचे म्हणजे जमिनीच्या खाली माती, मुरमाची उंची, खडकाची उंची, खडकाचा प्रकार बदलला तर प्रत्येक प्रकारच्या खडकाची उंची अशा सर्व नोंदी केल्या.

त्यांनी मे महिन्यातील विहिरींची पाणीपातळी मोजली. पुढे पूर्ण वर्षभराचा पाऊस मोजायला सुरुवात केली. पुढील सलग ७५ रविवारी निवडक ४१ विहिरींची पाणीपातळी मोजली. त्याची माहिती ॲक्वाडॅमला पाठवली. त्यांनी विहिरींच्या पंपिंग टेस्टही केल्या.

म्हणजे पाच मिनीट, दहा मिनीट, एक तास पंप चालवल्यानंतर पाणीपातळी किती खाली गेली आणि परत तीच मूळ पातळी यायला किती वेळ लागला हे तपासले. त्यावरून खडकातल्या पाण्याची गणिते केली. विहिरीतील खडकांच्या थरांची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजली. यावरून थराच्या जाडीची कल्पना आली. याच बरोबर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या भूजल विभागाचे (जीएसडीए) खडक, जलधरांचे नकाशे युवकांना समजावून सांगितले.

या नकाशावरूनच पाणी पुनर्भरण क्षेत्र (रिचार्ज झोन) आणि डिस्चार्ज झोन कसे आहेत, हे दाखवले. जमिनीखालील पाणी धरून ठेवणारा खडक म्हणजेच जलधराच्या सीमा दाखवल्या. यालाच ‘ॲक्विफर मॅपिंग’ असेही म्हणतात. सोप्या भाषेत समजावलेल्या माहितीमुळे युवकांचा आत्मविश्‍वास वाढला.

यानंतर विशाल देशमुख व सुदाम शिंदे या युवकांनी ‘ॲक्वाडॅम’चे पंधरा दिवसांचे पुढील प्रगत प्रशिक्षणातही भाग घेतला. त्यातून खडकशास्त्र, भूजलशास्त्र, जलधर सीमांकन व पाण्याचे नियोजन समजले. सोबत अशा शास्त्रशुद्ध कामांमुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या गावांच्या यशोगाथा दाखविण्यात आल्या.


श्रमदान आणि लोकांचा सहभाग ः
एकीकडे प्रशिक्षण सुरू असतानाच गावात पाणलोट विकासाच्या कामासाठी निवडक मंडळी श्रमदान करत होती. पण अन्य गावातील लोकांचा अद्यापही प्रतिसाद कमीच होता. आर्थिक निधीशिवाय सारे गाडे अडल्यासारखे झाले होते. सरकार दरबारी सादरीकरण, प्रस्ताव देऊनही आश्‍वासनांशिवाय काही मिळाले नव्हते.

प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मंडळी अजय बुरांडे यांच्यासोबत अंबेजोगाईच्या मानव लोकसंस्थेच्या अनिकेतभैया लोहिया यांना भेटले. त्यांनी काही अटीवर एक खोदाई मशिन पाठवले. शेतकऱ्याने डिझेलचा व ट्रॅक्टरचा खर्च करून या यंत्राने तळ्यातील गाळ काढून ट्रॅक्टरने शेतात टाकण्याचे नियोजन झाले. मात्र ज्यांनी शेताची बांधबंदिस्ती केली आहे, त्यांनाच हा गाळ देण्याचा अट होती. परिणामी, ९११ एकर शेतीची बांधबंदिस्ती झाली.

४० हेक्टर तलावातला गाळ अडीच महिन्यात दोनशे एकर शेतीमध्ये पसरविला गेला. आता सर्व गावात उत्साहाचे वातावरण पसरले. पुढच्या वर्षी अमिर खानच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेमध्ये गावाने भाग घेतला. त्या वेळी ही श्रमदानातून २१ हजार घनमीटर आणि मशिनने तीन लाख घनमीटर माती काम करून जलसंधारणाची विविध कामे केली. मुख्य म्हणजे या सर्व कामांच्या जागांची निवड खडकांच्या नकाशांच्या माहितीच्या आधारावरच केली.

गावात एक हजारपेक्षा अधिक शोष खड्डेही केले. कंपोस्ट खड्डे ९८२ केले. रोपवाटिका करून ११ हजार रोपे तयार केली. उत्साहाने लावलेल्या झाडांपैकी संगोपनाअभावी फक्त २०० झाडेच जगली. मात्र त्यातून धडा घेत यंदा पन्नास हेक्टरमध्ये वृक्षारोपणाचे नियोजन गावकऱ्यांनी केले आहे. या सर्व कामांमुळे सरासरी ५८१ मि.मी. पाऊस असूनही भूजलाचा साठा या गावात चांगलाच वाढला. गाळामुळे शेताची उत्पादकता तीन पट वाढली.

नियोजनावर भर ः
आता उपलब्ध भूजलाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले. साठवलेले पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनद्वारेच द्यायचे ठरवले. त्यामुळे गावातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले. आता गावात उसासारखे जास्त पाणी लागणारी पिके घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.

बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी आता कांद्याच्या बीजोत्पादनाकडे वळले आहेत. वर्षभराच्या संगोपनानंतर उसातून मिळणारे उत्पन्न कमी कालावधीत व पाण्यामध्ये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सलग एकच पीक घेण्यापेक्षा आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीचाही अवलंब केला जातो.

व्याख्यानच नव्हे तर कीर्तनही पाण्याचे!
सर्व गावातल्या लोकांचा सहभाग पुढे मिळवला याचे रहस्य काय असावे? २००९ पासून या गावात माजी खासदार कै. कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दरवर्षी एक ऑक्टोबरला एक व्याख्यान ठेवले जाते. त्यात प्रामुख्याने पाणी, शेती, विकास या विषयात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला बोलावले जाते.

अशा लोकांच्या मार्गदर्शनातून समाजमन हळूहळू घडत गेले. तरुणांचा एक गट गावात कायमच आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी निःस्वार्थपणे उपक्रम राबवत आहे. तरुणाईने उचल खाल्ल्यामुळे पाण्याच्या उपक्रमाला चालना मिळाली. त्यांना पूर्ण गावाने प्रतिसाद दिला. यातून हे गाव जलसंपन्न झाले. या वर्षी सात दिवसांचा कीर्तन महोत्सव गावात ठेवला होता.

त्यात प्रवचनकार, कीर्तनकारांना संतमंडळीनी शेती, पाणी आणि ग्रामीण विकासाविषयी केलेल्या अभंग, ओव्या यांच्यावरच निरूपण करण्याची सूचना केली होती. किती प्रगतिशील विचार आहे? या गावात कीर्तनही पाण्याचेच होते. पाणीच शेतीचे मूळ आहे, ते आले की त्याचे योग्य नियोजन केले तर संपन्नता आणि समृद्धी येणारच!

एकीकडे प्रशिक्षण सुरू असतानाच गावात पाणलोट विकासाच्या कामासाठी निवडक मंडळी श्रमदान करत होती. पण अन्य गावातील लोकांचा अद्यापही प्रतिसाद कमीच होता. आर्थिक निधीशिवाय सारे गाडे अडल्यासारखे झाले होते. सरकार दरबारी सादरीकरण, प्रस्ताव देऊनही आश्‍वासनांशिवाय काही मिळाले नव्हते.

प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मंडळी अजय बुरांडे यांच्यासोबत अंबेजोगाईच्या मानव लोकसंस्थेच्या अनिकेतभैया लोहिया यांना भेटले. त्यांनी काही अटीवर एक खोदाई मशिन पाठवले. शेतकऱ्याने डिझेलचा व ट्रॅक्टरचा खर्च करून या यंत्राने तळ्यातील गाळ काढून ट्रॅक्टरने शेतात टाकण्याचे नियोजन झाले.

मात्र ज्यांनी शेताची बांधबंदिस्ती केली आहे, त्यांनाच हा गाळ देण्याचा अट होती. परिणामी, ९११ एकर शेतीची बांधबंदिस्ती झाली. ४० हेक्टर तलावातला गाळ अडीच महिन्यात दोनशे एकर शेतीमध्ये पसरविला गेला.

आता सर्व गावात उत्साहाचे वातावरण पसरले. पुढच्या वर्षी अमिर खानच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेमध्ये गावाने भाग घेतला. त्या वेळी ही श्रमदानातून २१ हजार घनमीटर आणि मशिनने तीन लाख घनमीटर माती काम करून जलसंधारणाची विविध कामे केली. मुख्य म्हणजे या सर्व कामांच्या जागांची निवड खडकांच्या नकाशांच्या माहितीच्या आधारावरच केली.

गावात एक हजारपेक्षा अधिक शोष खड्डेही केले. कंपोस्ट खड्डे ९८२ केले. रोपवाटिका करून ११ हजार रोपे तयार केली. उत्साहाने लावलेल्या झाडांपैकी संगोपनाअभावी फक्त २०० झाडेच जगली. मात्र त्यातून धडा घेत यंदा पन्नास हेक्टरमध्ये वृक्षारोपणाचे नियोजन गावकऱ्यांनी केले आहे.


या सर्व कामांमुळे सरासरी ५८१ मि.मी. पाऊस असूनही भूजलाचा साठा या गावात चांगलाच वाढला. गाळामुळे शेताची उत्पादकता तीन पट वाढली.

नियोजनावर भर ः
आता उपलब्ध भूजलाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले. साठवलेले पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनद्वारेच द्यायचे ठरवले. त्यामुळे गावातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले. आता गावात उसासारखे जास्त पाणी लागणारी पिके घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.

बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी आता कांद्याच्या बीजोत्पादनाकडे वळले आहेत. वर्षभराच्या संगोपनानंतर उसातून मिळणारे उत्पन्न कमी कालावधीत व पाण्यामध्ये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सलग एकच पीक घेण्यापेक्षा आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीचाही अवलंब केला जातो.

व्याख्यानच नव्हे तर कीर्तनही पाण्याचे!
सर्व गावातल्या लोकांचा सहभाग पुढे मिळवला याचे रहस्य काय असावे? २००९ पासून या गावात माजी खासदार कै. कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दरवर्षी एक ऑक्टोबरला एक व्याख्यान ठेवले जाते. त्यात प्रामुख्याने पाणी, शेती, विकास या विषयात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला बोलावले जाते. अशा लोकांच्या मार्गदर्शनातून समाजमन हळूहळू घडत गेले. तरुणांचा एक गट गावात कायमच आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी निःस्वार्थपणे उपक्रम राबवत आहे.

तरुणाईने उचल खाल्ल्यामुळे पाण्याच्या उपक्रमाला चालना मिळाली. त्यांना पूर्ण गावाने प्रतिसाद दिला. यातून हे गाव जलसंपन्न झाले. या वर्षी सात दिवसांचा कीर्तन महोत्सव गावात ठेवला होता. त्यात प्रवचनकार, कीर्तनकारांना संतमंडळीनी शेती, पाणी आणि ग्रामीण विकासाविषयी केलेल्या अभंग, ओव्या यांच्यावरच निरूपण करण्याची सूचना केली होती. किती प्रगतिशील विचार आहे? या गावात कीर्तनही पाण्याचेच होते. पाणीच शेतीचे मूळ आहे, ते आले की त्याचे योग्य नियोजन केले तर संपन्नता आणि समृद्धी येणारच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT