Maratha Reservation Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation Survey : नगर जिल्ह्यात दहा लाख मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण होणार

Survey Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभरात मंगळवारपासून (ता.२३) सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nagar News : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभरात मंगळवारपासून (ता.२३) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना शनिवारी (ता. २०) या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,

तहसीलदार आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी असे १३० अधिकारी उपस्थित होते. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. गोखले इन्स्टिट्यूटचे सिद्धांत कांबळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मराठा सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेले अ‍ॅप, त्यातील प्रश्‍नावली आणि प्रश्‍नावलीनुसार अशा प्रकारे उत्तर त्यात समाविष्ट करावयाचे, याची माहिती देत प्रशिक्षण दिले.

मराठा मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात मागसवर्गीय कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्‍न असून मराठा समाजाची मात्र विस्तृत माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही माहिती संबंधित खुला प्रवर्ग अथवा मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक,

आरोग्यविषयक आणि कौटुंबिक माहितीशी निगडित आहे. यासाठी १५० ते १८० प्रश्‍न आणि उपप्रश्‍न असून यात एखाद्या मराठा कुटुंबाकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहन आहे का? असल्यास ते कोणते आहे आणि पुढील उपप्रश्‍न राहणार आहेत, तसेच वाहन नाही, असे उत्तर अ‍ॅपमध्ये भरल्यास तो प्रश्‍न संपणार आहे. साधारणपणे कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि कौटुंबिक माहिती सर्वेक्षणात येणार आहे.

दहा हजार प्रगणक

जिल्ह्यात सर्वेक्षणादरम्यान सुमारे १० लाख कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येणार असून यासाठी १० हजार ३०० प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली आहे. गावपातळीवरील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे उपजिल्हाधिकारी मोरे यांनी सांगितले. एका कुटुंबासाठी साधारणपणे एक तासांचा कालावधी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT