PM Narendra Modi : 'आमचा राम आला, तो तंबूत नाही तर दिव्य मंदिरात राहणार' : प्रधानमंत्री मोदी

Ram Mandir pran pratishthta : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राम मंदिराचे उद्धाटन केले. तसेच रामाच्या नवीन मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. आमचे राम आले आहेत. ते तंबूत राहणार नाहीत, तर आता दिव्य मंदिरात राहतील.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता.२२ रोजी) अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्धाटन पार पडले. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते आज रामलल्लाच्या नव्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना देखील करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. यानंतर देशातील पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा देताना, "आमचे राम आले. आता ते तंबूत नाही तर भव्य दिव्य मंदिरात राहणार असे म्हटले आहे. तसेच त्यांनी, राम मंदिराचं महत्त्व सांगताना, राम मंदिर पुन्हा साकार होणं ही एक मोठी तपश्चर्याचा असल्याचे म्हटलं आहे.

यावेळी मोदी यांनी, जे मला येथे जाणवले ते देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना जाणवेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा आधार आहे. राम हा भारताचा विचार आहे. राम हा भारताचा कायदा आहे, भारताची प्रतिष्ठा आहे. राम हाच भारत आहे असेही ते म्हणाले.

रामाचा १४ वर्षांचा वनवास

तसेच राम महिमा, राम प्रभाव, राम प्रवाह असून तोच शाश्वत आहे. तोच सातत्य, तोच सत्य आणि व्यापक, तो वैश्विक आत्मा आहे. म्हणून रामाचा आदर केला जातो. रामाचा आदर केला तरच त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकतो असे मोदी यांनी म्हटलं आहे. तर त्या काळातील लोकांनी रामाचा १४ वर्षांचा वनवास पाहिला. मात्र या काळात अयोध्या आणि देशवासीयांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला. आमच्या अनेक पिढ्यांनी हा वियोग सहन केल्याचे ते म्हणाले.

PM Narendra Modi
Shri Ram Ayodhya : अशीही राम भक्ती, रामललाना भेटण्यासाठी कोल्हापूर ते आयोध्या केला सायकल प्रवास

मी प्रभू श्री रामाचीही माफी मागतो

पुढे मोदी म्हणाले, "आज मी प्रभू श्री रामाचीही माफी मागतो. आपल्या प्रयत्नात, त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी उणीव राहिली असावी, ज्यामुळे आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव भरून निघाली आहे. माझा विश्वास आहे की. भगवान श्रीराम आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील. तर या क्षणांचे साक्षीदार असणारे लोक या तारखेबद्दल बोलतील. ही तारीख, या या क्षणाबद्दल लोक आजपासून हजार वर्षांनंतरही बोलतील. हा रामाचा इतका मोठा आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत असेही ते म्हणाले.

तसेच मोदी पुढे म्हणाले की, ही एका नव्या युगाची सुरुवात असून २२ जानेवारी ही फक्त कॅलेंडरमधील तारीख नाही. हे नवीन कालचक्राचे मूळ आहे. हा क्षण अलौकिक आणि सर्वात पवित्र आहे.

आता आमचा राम

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, शतकानुशतकांच्या तपश्चर्येनंतर आज आमचे प्रभू राम आलेत. आता आमचे प्रभू राम तंबूत नाही, तर आता दिव्य मंदिरात राहणार आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हा क्षण अलौकिक आहे. ही ऊर्जा आणि वेळ म्हणजे आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आहे असे ते म्हणालेत.

PM Narendra Modi
Ram Mandir : राम मंदिराच्या सजावटीत हापूरच्या गुलाबांचा सुगंध; शेतकऱ्याला मिळाली तब्बल १० टनांची ऑर्डर

मोदी तपस्वी : मोहन भागवत

यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नसल्याचे सांगत भारताची शान रामललासोबत परतली आल्याचे म्हटलं आहे. तसेच प्राणप्रतिष्ठापनेसाठी मोदींनी कडक उपवास केला ते तपस्वी आहेत. तर आधी संसारातील कलहामुळे १४ वर्षे वनवासात गेलेले राम आज पुन्हा आले आहेत असेही भागवत यांनी म्हटलं आहे.

जगातील पहिलीच अनोखी घटना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "श्री रामजन्मभूमी ही कदाचित जगातील पहिलीच अनोखी घटना आहे. ज्यामध्ये एखाद्या राष्ट्रातील बहुसंख्य समुदायाने मंदिर उभारणीसाठी इतकी वर्षे आणि अनेक पातळ्यांवर लढा दिला. पण आज माझा आत्मा आनंदित आहे की मंदिर जिथे बांधायचा संकल्प केला होता तिथेच बांधले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com