Village Development Agrowon
ॲग्रो विशेष

Village Development : समृद्धी योजनेतून 800 तांडे आणि वसाहतींसाठी 675 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर

Sant Sevalal Maharaj Samruddhi Scheme : यवतमाळ जिल्ह्याभरातील ७९१ तांडे, वस्त्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेतून चकाचक केली जाणार आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याभरातील ७९१ तांडे, वस्त्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेतून चकाचक केली जाणार आहेत. यामध्ये भौतिक सोयीसुविधांसह रस्ते, नाल्या, समाज मंदिर आदींचा समावेश आहे. त्यासाठी ६७५ कोटी ७३ लाखांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. आता आचारसंहिता काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही. परंतु येत्या काळात या योजनेच्या माध्यमातून तांडे, वस्त्यांचा कायापालट होणार आहे.

जिल्ह्यात सध्या एक हजार २०१ ग्रामपंचायती आहे. यातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायती बंजाराबहुल आहे. तर तब्बल ७२८ तांडे अस्तित्वात आहेत. या तांड्यात आजघडीस भौतिक सोईसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, वास्तव्य करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, नाली, गटार, समाज भवन, शिक्षणाची सुविधा मिळत नाही. त्यामुळे मध्यंतरी संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत ४१ तांड्यांना महसुली दर्जा दिल्या जाणार आहे. साधारणतः २५० हून अधिक लोकसंख्या असल्यास महसुली दर्जा देण्यात येतो.

यामध्ये आर्णी पाच, दारव्हा चार, दिग्रस पाच, घाटंजी सहा, महागाव तीन, पुसद चार, उमरखेड १४, अशा मिळून ४१ तांड्यांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने बृहृत् आराखडा बनवून पाठवावा, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सोळाही पंचायत समितीतून ७९१ तांडे, वस्त्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या ठिकाण भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६७५ कोटी ७३ लाखांचा निधी आवश्यक आहे. प्राप्त प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहे. तीन वर्षांचा बृहृत आराखडा पंचायत समिती प्रशासनाने पाठवला आहे. वेगवेगळी जवळपास २५ प्रकारची माहिती या प्रस्तावात समाविष्ट आहे.

५४ तांडे होणार ग्रामपंचायतीत समाविष्ट

या योजनेच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्यांमध्ये आर्णी चार, दारव्हा सहा, दिग्रस दोन, घाटंजी दोन, महागाव १४, पुसद २०, उमरखेड सहा, अशा एकूण सात तालुक्यातील ५४ तांड्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Agrowon Podcast: टोमॅटोच्या दरात तेजी; हिरवी मिरची टिकून, केळीला उठाव, कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजार दबावातच

Nashik Industrial Hub : उद्योजकांनी पर्यावरणपूरक,प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे

Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

SCROLL FOR NEXT