Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : साहेब, आमचेही पदनाम सहायक कृषी अधिकारी करा

Designation Change Demand : राज्यात कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचेही पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्याची जुनी मागणी यानिमित्ताने नव्याने पुढे आली आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून शासनाने ग्रामपंचायत अधिकारी असे नामाभिदान करण्यात आले आहे. अशाच प्रकारे राज्यात कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचेही पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्याची जुनी मागणी यानिमित्ताने नव्याने पुढे आली आहे.

राज्य शासनाने २४ सप्टेंबरला ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदासंदर्भात निर्णय घेत ग्रामपंचायत अधिकारी असे नवे नाव दिले आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्याची मागणी प्रलंबित आहे. आमचेही पदनाम बदलावे, अशी मागणी राज्यभरातील कृषी सहायकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विद्यमान कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यभर गाव पातळीवर कृषी विभागाचा आरसा म्हणून कृषी सहायक काम करीत असतात. कृषी विभागाच्या संपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी हा घटक वर्षानुवर्षे पार पाडतो आहे. कृषी सहायकांच्या अनेक मागण्या आजवर आयुक्तालय व शासन स्तरावरून मान्य झाल्या. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या असून, त्यासाठी कृषी सहायक संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असते.

शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांमध्ये कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्याची मागणी गेल्या १० ते १२ वर्षांपासून कायम आहे. मध्यंतरी अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री असताना त्यांनी हे पदनाम बदलाबाबत आश्‍वासनही दिले होते. आमदारांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर तेव्हा मंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते, असे कृषी सहायक सांगत आहेत. मात्र या पदनाम बदलाच्या मागणीवर पुढे शासनस्तरावर काहीही झालेले नाही. आता ग्रामसेवकांचे बदनाम बदलल्याने कृषी सहायकांच्या मागणीला उजाळा मिळाला आहे. विद्यमान सरकारने कृषी सहायकांना सहायक कृषी अधिकारी असे पदनाम द्यावे, या मागणीला राज्यभरात जोर आलेला आहे.

राज्यात सध्या सुमारे साडेअकरा हजारांवर कृषी सहायकांची पदे आहेत. पदनाम बदलल्यामुळे कुठलाही आर्थिक बोजासुद्धा शासनावर पडणार नाही. केवळ नाव बदलणार असल्याचे कृषी सहायक सांगत आहेत. आमच्या मागणीकडे विद्यमान शासनाने तातडीने लक्ष देत बदल करावे, असे कृषी सहायकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

SCROLL FOR NEXT