Agriculture Department : सेवेत यशस्वी व्हायचे असल्यास शेतकऱ्यांना आदराने वागवा

Director of Input and Quality Control Vikas Patil: कृषी अधिकाऱ्यांना सेवेत यशस्वी व्हायचे असल्यास शेतकऱ्याला आदराने मदत, मार्गदर्शन करायला हवे, असे स्पष्ट मत राज्याचे मावळते निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.
Director of Input and Quality Control Vikas Patil
Director of Input and Quality Control Vikas PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकरी कृषी विभागाकडे अनुदानाच्या आशेने नव्हे; तर शेतीमधील तंत्रज्ञान, सल्ला घेण्यासाठी येतात. कृषी अधिकाऱ्यांना सेवेत यशस्वी व्हायचे असल्यास शेतकऱ्याला आदराने मदत, मार्गदर्शन करायला हवे, असे स्पष्ट मत राज्याचे मावळते निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.

कृषी आयुक्तालयाच्या पद्श्री सभागृहात सोमवारी (ता. ३०) श्री. पाटील यांच्या निवृत्तीनिमित्ताने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते; तर व्यासपीठावर कृषी संचालक विनयकुमार आवटे (विस्तार व प्रशिक्षण), रफिक नाईकवाडी (मृद्‍ संधारण व पाणलोट क्षेत्र विकास),

Director of Input and Quality Control Vikas Patil
Agriculture Department : ‘एसएओं’कडून जलसंधारण समितीचे सचिवपद काढले

सुनील बोरकर (प्रक्रिया व नियोजन) तसेच माजी संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, सहसंचालक अंकुश माने, सौ. भारती विकास पाटील होते. कृषी विभागाच्या विस्तार कार्यात श्री. पाटील यांची तीन दशकांची सेवा गौरवपूर्ण असल्याचे या वेळी नमूद केले.

Director of Input and Quality Control Vikas Patil
Agriculture Department : २१४ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडवल्या

श्री. पाटील म्हणाले, की गरीब शेतकऱ्याच्या गोठ्यात गाय अडल्यानंतर उपचारासाठी मध्यरात्री उठून जाणारे वडील मला लाभले. ते पशुवैद्यकीय अधिकारी होते आणि त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा आदर केला.

तेच बाळकडू मी घेतले. माझी आई काटकसर करणारी होती. त्यामुळे मी माझ्या गरजा मर्यादित ठेवत कृषी खात्याची सेवा केली. सेवाकाळात मार्गदर्शन व मदत केल्याने यशस्वी झालेले असंख्य शेतकरी हेच माझ्या आयुष्यातील समाधान आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांना यशस्वी व्हायचे असल्यास त्यांनी शेतकऱ्यांचा आदर करायला हवा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com