Agriculture Department : २१४ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडवल्या

Appointments of Agricultural Officers : राज्याच्या कृषी विभागात मनुष्यबळाची टंचाई असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या २१४ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात संशयास्पदपणे टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले आहे.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या कृषी विभागात मनुष्यबळाची टंचाई असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या २१४ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात संशयास्पदपणे टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले आहे.

कृषी विभागाची कामे सातत्याने वाढत असताना मनुष्यबळ मात्र कमी होते आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांचे पदभार देण्याचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये ‘कृषी सेवा परीक्षा’ घेतली होती. त्यातून कृषी सेवा गट ‘अ’मधील उपसंचालक श्रेणीचे ४९ तर, कृषी सेवा गट ‘ब’मधील तालुका कृषी अधिकारी श्रेणीचे १०० उमेदवार निवडले गेले. याशिवाय कृषी सेवा गट ‘ब-कनिष्ठ’मधील मंडळ कृषी अधिकारी श्रेणीचे ६५ अधिकारी निवडले होते.

Department Of Agriculture
Agriculture Department : साहेब, आता आमचेही पदनाम बदला

स्पर्धा परीक्षेतून निवडलेल्या २१४ उमेदवारांची शिफारस आयोगाच्या सचिवांनी कृषी खात्याच्या प्रधान सचिवांकडे करुन चार महिने उलटले आहेत. तरीदेखील नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. नियुक्ती देण्यापूर्वी नागरी सेवा मंडळाची बैठक घ्यावी लागते. परंतु, त्यापूर्वीही उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. तशी पडताळणी ९ व १० सप्टेंबरला झाली. मात्र, उमेदवारांकडून विभागीय पसंतीक्रम मागवलेले नाहीत. पसंतीक्रम मागवले नसल्यामुळे कृषी सचिवांनी नागरी सेवा मंडळाची बैठकदेखील घेतलेली नाही. परिणामी सर्व उमेदवार संभ्रमात आहेत.

Department Of Agriculture
Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

एका उमेदवाराने सांगितले की, आम्ही शेतकरी कुटुंबातील उमेदवार असून कृषी खात्यात सेवा करण्यास इच्छुक आहोत. परंतु, असे ढिसाळ सरकारी कामकाज पाहून नाराज झालेलो आहोत. आयोगाने उमेदवाराची शिफारस करताच ९० दिवसांच्या आत नियुक्ती द्यावी, असा शासनाचाच निर्णय आहे. त्यामुळे आम्हाला नियुक्ती न देण्यामागे होत असलेली दिरंगाई शंकास्पद आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास नियुक्त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची भीती आम्हाला वाटते.

‘त्या’ पदांचा परीक्षेत समावेश

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यात आला आहे. यात उपसंचालकाची ४८, तालुका कृषी अधिकारी किंवा तंत्र अधिकाऱ्याची ५३ तसेच कनिष्ठ कृषी अधिकाऱ्याच्या १५७ पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वी कृषी खात्याच्या परीक्षा स्वतंत्र घेत होता. मात्र, आता आयोगाने संयुक्त परीक्षेत कृषीच्या पदांचा समावेश केला आहे. त्यामुळे कृषी विभागाला वेळेत मनुष्यबळ मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com