Cereals Agrowon
ॲग्रो विशेष

Nutritious Cereals : पौष्टिक तृणधान्याचा वारसा

Cereals : विदर्भातील मेळघाट म्हणून प्रसिद्ध असलेला धारणी व चिखलदरा परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. या भागातील रहिवासी स्वतःपुरते भरडधान्याचे उत्पादन घेतात. पूर्णतः निसर्गावर आधारित तृणधान्य असल्यामुळे ते सेंद्रिय पद्धतीनेच उत्पादित होते.

Team Agrowon

डॉ .प्रणिता कडू

Healthy Cereals : विदर्भातील मेळघाट म्हणून प्रसिद्ध असलेला धारणी व चिखलदरा परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. या भागातील रहिवासी स्वतःपुरते भरडधान्याचे उत्पादन घेतात. पूर्णतः निसर्गावर आधारित तृणधान्य असल्यामुळे ते सेंद्रिय पद्धतीनेच उत्पादित होते. या धान्यांपासून पातळ पेज तयार केली जाते.

लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्ती, तसेच गर्भवती महिला असो की स्तनदा माता या सर्व घटकांना गरजेनुसार उपचारात्मक पोषण आहार म्हणजे विविध तृणधान्ये. तृणधान्य खाण्यायोग्य करण्यासाठी प्राथमिक प्रक्रियेची किचकट व कष्टदायी पद्धती आणि ग्राहकांची खरेदीबाबतच्या उदासीनतेमुळे ही पिके मागे पडत आहेत.

कोदो,कुटकी,राजगिरा,सावा (भगर /वरी) सारखा हा निसर्गाचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी २०२२ पासून सरकारने जागतिक तृणधान्य वर्ष जाहीर केले. त्यामुळे लोप पावत चाललेल्या धान्याबद्दल लोकांच्यामध्ये पुन्हा एकदा जागृती आली आहे. त्यातील औषधी व पोषणयुक्त गुणधर्मांचा प्रचार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन केले. यामुळे मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नष्ट होत चाललेल्या तृणधान्यांच्या लागवडीस चालना दिली आहे.

फास्टफूड, पाश्चात्त्य आहारामुळे लहान मुलांच्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार होत आहेत. प्रत्येकाची प्रतिकार शक्ती कमजोर झाली आहे. हे लक्षात घेता तृणधान्यापासून तयार केलेली खीर, उपमा ,शिरा, थालीपीठ, घागरे या सारख्या पदार्थांना ग्राहकांच्याकडून मागणी वाढली आहे.

वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, मज्जासंस्था निरोगी ठेवणे, मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त असणारे, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी हृदयरोग,कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तृणधान्य महत्त्वाची आहेत.

तृणधान्यामध्ये अनेक पोषकतत्त्व जसे जीवनसत्त्व अ, बी, इबी२, बी३, लोह, कॉपर, पोटॅशियम, झिंक, कॅल्शिअम, सल्फर, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, प्रथिने, तंतुमय पदार्थ, फॉलिक अॅसिड, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ उपलब्ध आहेत. पौष्टिक तृणधान्यापासून तयार पिठे,लाह्या,पोहे ,बेकरी पदार्थासारखे मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ निर्मितीचे छोटे लघुउद्योग सुरु झाल्यास पौष्टिक व स्वस्त पदार्थ निर्मिती करता येते. या पदार्थांना मागणी वाढत आहे.

(गृहविज्ञान विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT