Cereal Farming : पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढावे

Farmer Seminar : अकोला जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई आदी पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढावे या दृष्टिकोनातून पौष्टिक तृणधान्य शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्राचे आयोजन मोरगाव भाकरे येथे करण्यात आले.
Farmer Seminar
Farmer SeminarAgrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई आदी पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढावे या दृष्टिकोनातून पौष्टिक तृणधान्य शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्राचे आयोजन मोरगाव भाकरे येथे करण्यात आले. या वेळी उद्‌घाटक म्हणून पंचायत समिती सदस्या शुभांगी भटकर, उपसरपंच अर्चना चोपडे उपस्थित होत्या.

मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाल ठाकरे, तंत्र अधिकारी चंचल शेंडे, कृषी अधिकारी प्रतिभा गर्जे, वृषाली गाढे, प्रगतिशील शेतकरी पांडुरंग भाकरे, शिवशंकर वंजारे, पोकरा प्रकल्प समन्वयक गोपाल बोंडे, डॉ. शुभांगी खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Farmer Seminar
Rala Cereals : आरोग्यदायी तृणधान्य : राळा

या वेळी व्ही. एम. शेगोकार यांनी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यामागे काय उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य संकल्पना काय आहे याची माहिती दिली. डॉ. गोपाल ठाकरे यांनी सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी कसे फायदेशीर आहे हे सांगत पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.

Farmer Seminar
Cereal Effect : भरडधान्य वर्षाचे फलित काय?

दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे का गरजेचे आहे व मानवी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी इत्यादी धान्यांपासून चविष्ट व सकस पदार्थ तयार करण्याचेही आवाहन केले. गोपाल बोंडे यांनी शुन्य मशागत तंत्राविषयी तर डॉ. खंदारे यांनी ज्वारी, बाजरी पिकावरील एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन व उपाय योजना मांडल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांनी केले. कृषी सहाय्यक मंगेश पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्यक नीलेश साबळे, पंकज झरे, श्रीकांत गावंडे, कृषी मित्र सुरेश भटकर, दीपक भाकरे, आत्माराम भाकरे, पांडूरंग इंगळे, महिला गटाच्या अध्यक्षा प्रतिभा भटकर, प्रविण भटकर, गजानन वाघ, छाया माळी, पल्लवी भाकरे, दुर्गा राठोड, पल्लवी जंजाळ, कल्पना ढोकणे, आरती सूर्यवंशी, पूजा आगरकर यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला मोरगांव (भाकरे), बाखराबाद, रुसुलाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com