Rala Cereals : आरोग्यदायी तृणधान्य : राळा

Healthy Cereals Rala : राळा हे अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे. जीवनसत्त्व, खनिजे आणि इतर पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत असल्याने राळा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सेवनामुळे रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
Rala Cereal
Rala CerealAgrowon

श्रीकांत कर्णेवार, श्रद्धा देशपांडे

जाती

प्रसाद : कमी कालावधीची जात.

मिथुन : कमी कालावधीची जात. कीड,रोगास प्रतिकारक.

पीडीकेव्ही यशश्री : धान्य उत्पादन क्षमता (२३२४ किलो./हे.), कडबा उत्पादन क्षमता (४४८९ किलो./हे.). दाणे  मध्यम टपोरे  असून  रंग आकर्षक फिक्कट पिवळसर आहे. ८१ ते ८५ दिवसात पक्वता. कणीस घट्ट असते. करपा आणि तांबेरा रोगास सहनशील.

राळा हे गवतवर्गीय कुळातील  तृणधान्य पीक  आहे. या पिकाची धान्य तसेच चारा म्हणून आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडात लागवड केली जाते. स्वपरागीभवन, कमी पक्वता कालावधी आणि सी-चार वर्गीय तृणधान्य हे प्रमुख गुणधर्म आहेत.

आपल्या देशात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात लागवड केली जाते. राळा हे अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह आणि जीवनसत्त्व ब मोठ्या प्रमाणात आहे. हे ग्लूटेन मुक्त आणि कॅलरी कमी आहे.

फायदे

लोह आणि कॅल्शियमचा चांगला पुरवठा असल्याने हाडे, स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त. लोहाच्या कमतरतेमुळे कमकुवत स्नायू, अशक्तपणा येतो. ठिसूळ हाडे, जळजळ आणि ऑस्टिओपोरोसिस,संधिवात, स्पॉन्डिलायटिस यासारख्या हाडांशी संबंधित आजारात शरीराच्या कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित आहारात राळ्याचा समावेश करावा.

Rala Cereal
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

मधुमेही  रुग्णांना सामान्यतः तांदळाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. राळा पिकाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५०.८ वर आहे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन आणि लिपिड प्रोफाइलमध्ये निरोगी घट पाहण्यासाठी दैनंदिन आहारात याचा समावेश करावा.

यामध्ये भरपूर प्रमाणात ट्रिप्टोफॅन हे अमिनो ॲसिड भूक न लागण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. शरीरात चरबीयुक्त पदार्थ जमा होण्यास प्रतिबंध करते.

जीवनसत्त्व, खनिजे आणि इतर पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत असल्याने राळा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते.

निरोगी आतडे हे संपूर्ण स्वस्थ आरोग्याचे लक्षण आहे. पचनविषयक समस्यांचे लवकर निराकरण न केल्यास ते जुनाट होतात. गंभीर  बद्धकोष्ठता, अतिसार किंवा चिडचिड होऊ शकते. यावर उपाय म्हणजे राळा आपल्या आहारात आवश्यक आहे.

राळा खराब कोलेस्टेरॉल कमी करते. लेसिथिन आणि मेथिओनाइनसह अमिनो ॲसिडचा चांगला स्रोत आहे. यकृतातील अतिरिक्त चरबी कमी करून कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्त्वपूर्ण ठरते.

ग्लूटेनमुक्त आणि प्रथिनांनी समृद्ध आहे. न्यूरोट्रांसमीटर एसिटाइलकोलीनच्या निर्मितीमध्ये मदत करते,जे हृदयाच्या कार्याचे संरक्षण करण्याबरोबरच स्नायू आणि मज्जातंतूंमध्ये संदेश हस्तांतरित करतात.

Rala Cereal
Cereals Seed :तृणधान्यांचे बियाण्यासाठी ‘महाबीज’ची मदत घेणार

योग्य प्रमाणात सेवन

राळ्यामधील फायटिक ॲसिड नावाचे संयुग असते, जे कॅल्शिअम आणि लोहासारख्या खनिजांच्या शोषणात व्यत्यय आणू शकते. यामुळे पोटात गोळा येणे, मळमळ आणि अतिसार होऊ शकतो.

ऑक्सॅलिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे काही लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. काही व्यक्तींमध्ये राळ्याची ॲलर्जी होऊ शकते, म्हणून ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आहारात वापरताना काळजी

धूळ आणि इतर दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी राळा शिजवण्यापूर्वी नेहमी धुवावा. खाण्यापूर्वी किमान १५ मिनिटे उकळावा. थंड, कोरड्या जागी साठवण करावी. न शिजवलेला किंवा कमी शिजवलेल्या राळ्याचा आहारात वापर करू नये.

योग्य प्रमाणात शिजवा

राळा भाताप्रमाणेच शिजवतात. वापरण्यापूर्वी धान्य पूर्णपणे स्वच्छ धुवावे. एका भांड्यात पाण्यामध्ये (राळा आणि पाण्याचे १:२ प्रमाण) भिजवावा. एक उकळी आणावी. उष्णता कमी करून झाकून ठेवावे. सुमारे १५ ते २० मिनिटे दाणे मऊ होईपर्यंत आणि पाणी शोषले जाईपर्यंत राळा उकळावा.

श्रीकांत कर्णेवार, ९४२२३०२५६९

(डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com