Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Variety : विद्यापीठाने आणला जास्त उत्पादन देणारा हरभरा वाण

Team Agrowon

Akola News : हरभऱ्याचा नवीन वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आणला आहे. सुपर जॅकी (एकेजी १४०२) हा वाण हेक्टरी २०.७३ क्विंटलपर्यंत उत्पादकता देऊ शकेल. ९५ दिवसांतच पीक काढणीसाठी तयार होऊ शकणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गेले तीन दिवस चाललेल्या ‘जॉइंट अॅग्रेस्को’मध्ये या विद्यापीठाचे विविध पिकांचे वाण, यंत्रे, तंत्रज्ञान शिफारशी यंदा मोठ्या प्रमाणात मंजूर झाल्या आहेत. रब्बी हंगामाच्या दृष्टीने हरभऱ्याचा चांगला वाण व यंत्राचा वापर करता येईल असा वाण आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाण व यंत्रे तयार झाली.

हरभरा सुपर जॅकी (एकेजी १४०२) वाणाची वैशिष्ट्ये

हेक्टरी २०.७३ क्विंटल उत्पादकता.

९५ दिवसात एकाच वेळी येणारा वाण, जाड दाणा.

यांत्रिक पद्धतीने काढण्यास सुलभ.

मर रोगाला प्रतिरोधक ते मध्यम प्रतिरोधक.

करपा रोगास मध्यम प्रतिकारक.

धान : पीडीकेव्ही साक्षी

हेक्टरी ४४ क्विंटल उत्पादकता.

१२० दिवसात येणारा वाण.

लांब बारीक दाण्याचा, खाण्यास उत्तम, ठेंगणा व न लोळणारा.

उच्च पोषण युक्त (जस्त २५, लोह १० पीपीएम).

पानावरील करपा, ग्लूम डिस्क्लरेशन, खोडकिडींना साधारण प्रतिकारक.

मोहरी : पीडीकेव्ही कार्तिक (एसीएन २३७)

हेक्टरी १५ क्विंटल उत्पादन.

तेलाचे ४०.३२ टक्के अधिक प्रमाण.

शेंगामध्ये बियांची संख्या जास्त.

मावा आणि भुरी रोगाला स्पर्धाक्षम वाणांपेक्षा तुलनात्मक.

करडई- पीडीकेव्ही व्हाईट

(एकेएस ३५१)

हेक्टरी १६.९५ क्विंटल उत्पादन.

तेलाचे (२८ ते ३३ टक्के) अधिक प्रमाण.

जाड व पांढऱ्या रंगाचा दाणा.

१३६ ते १४० दिवसात मध्यम ते उशिरा कालावधीसाठी पोषक.

मावा किडीस सहनशील.

अल्टररिया रोगास मध्यम प्रतिकारक.

कुटकी- पीडीकेव्ही तेजत्री (बीएलएम १८-२१)

लघुतृण धान्यवर्गीय पिकांपैकी एक असलेल्या कुटकीचा नवीन वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केला आहे. संशोधकांनी कुटकी- पीडीकेव्ही तेजश्री हा २२.६३ क्विंटल हेक्टरी उत्पादन देणारा वाण तयार केला. मध्यम ते उशिरा कालावधीसाठी पोषक आहे. राज्यात खरीप हंगामात याचे उत्पादन घेता येणार असून प्रमुख कीड व रोगास हा वाण सहनशील आहे.

ग्लॅडिओलस- पीडीकेव्ही सातपुडा पर्पल (एनजी ६)

राज्यात फुलशेतीला असलेला वाव लक्षात घेत ‘पंदेकृवि’च्या शास्त्रज्ञांनी ग्लॅडिओलसचा नवा वाण प्रसारित केला आहे. या वाणाचे हेक्टरी २.७७ लाख फुलदांडे मिळू शकतात. इतर वाणांच्या तुलनेत अधिक फुलदांड्याचे उत्पादन मिळणार आहे. प्रति झाड कंदाचे अधिक उत्पादन (२.५९) मिळते.

आकर्षक जांभळ्या पाकळ्या व त्यावर गडद निळसर जांभळ्या रंगाच्या पट्ट्या.

लांब सरळ फुलदांडा (१०५.८० सेंमी).

फुलदांड्यावरील फुलांची अधिक संख्या (१५.५०).

फुलदाणीतील अधिक टिकवण क्षमता (१०.३८ दिवस).

मर रोगास मध्यम प्रतिकारक.

शेतकरी सुलभ यंत्रेही प्रसारित

हळद उत्पादकांसाठी शोधले काढणी यंत्र. कृषी अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञांनी हळद उत्पादकांच्या समस्या लक्षात घेत ट्रॅक्टर चलित हळद काढणी यंत्र प्रसारित केले आहे. गादी वाफ्यावरील हळद काढणीसाठी याचा वापर होऊ शकेल. याची कार्यक्षमता ९८.५२ टक्के आहे. श्रम, वेळेची बचत आणि टिकाऊ बांधणी, वापरण्यासाठी सुलभ

इंधन कांड्या बनवणारे यंत्र

‘पंदेकृवि’च्या शास्त्रज्ञांनी लहान ट्रॅक्टर चलित इंधन कांड्या तयार करण्यासाठी यंत्र शोधले आहे. याद्वारे सोयाबीन कांड व पऱ्हाटी या कृषी अवशेषांपासून १५ मिमी आकाराच्या इंधन कांड्या तयार करता येतात. मशिनची क्षमता प्रतितास ५० किलोग्रॅम एवढी आहे. कृषी अवशेष भरणे, त्याचे मिश्रण आणि इंधन कांड्या यंत्रणा चालीविनेसाठी छोटे ट्रॅक्टर (१८ ते २८ अश्वशक्ती) पुरेशे आहे. इंधन कांड्यांची घनता व उष्मांक मूल्य यामध्ये कृषी अवशेषाच्या तुलनेत सुधारणा होते. इंधन कांड्यांचा उपयोग सुधारीत शेगड्यांमध्ये करता येतो.

रोटाव्हेटर संलग्न पटाशी नांगर

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शास्त्रज्ञांनी ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर संलग्न पटाशी नांगर तयार केला आहे. रोटाव्हेटरच्या अधिक वापरामुळे तयार झालेला जमिनीखालील कडक भाग फोडण्यासाठी वापर करता येतो. पटाशी नांगराच खोली २३ ते ४५ सेंमीपर्यंत ठेवता येते. ५८ टक्के एकूण कामाच्या खर्चात बचत तसेच वेळेमध्येही एकूण कामाच्या ४६ टक्के बचत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT