Mango Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Heathy Mango : आरोग्यदायी कैरी

Health Benefits of Kairi : कैरीमध्ये जीवनसत्त्व क असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कैरीमध्ये कॅरोटीनॉइड मोठ्या प्रमाणात असते.

Team Agrowon

आदिती बचाटे, डॉ. विजया पवार

Mango Food Processing : कैरीमध्ये जीवनसत्त्व क असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कैरीमध्ये कॅरोटीनॉइड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. कैरीमध्ये जीवनसत्त्व ब आणि तंतुमय घटक असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खावी. कैरीमध्ये आढळणारे झिआक्सॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. कैरीमध्ये पोटॅशिअमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते, हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. कैरीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते. कच्च्या कैरीमधील गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही.

बिनतेलाचे लोणचे

साहित्य : कैरी फोडी १ किलो, मीठ ११० ग्रॅम, मिरची पावडर ३० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम, सोडिअम बेन्झोएट ०.२५ ग्रॅम.

कृती : कैरीचे साल काढावे. छोटे चौकोनी तुकडे करावेत. मीठ सोडिअम बेन्झोएट मिसळावे. फोडी उन्हामध्ये दोन दिवस वाळवाव्यात. नंतर मिरची पावडर, हिंग पावडर मिसळावी. तयार लोणचे स्वच्छ काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरावे.

गोड लोणचे

साहित्य : आंबट कैरी १ किलो, मोहरी डाळ १०० ग्रॅम, धणे ५०० ग्रॅम, मेथी दाणे २५ ग्रॅम, गूळ ५०० ग्रॅम, मीठ, लाल तिखट चवीनुसार, २ चमचे, लवंग दालचिनी जायफळ पूड, हिंग, तिळाचे तेल.

कृती : कैरीच्या मध्यम फोडी करून घ्याव्यात. धणे-मेथी दाण्याची भरडपूड करावी. गूळ किसून घ्यावा. मोहरी डाळ, धने पूड, मेथी पूड कोरडी भाजून घ्यावी. हिंग पूड करावी. एका परातीत लाल-तिखट, हिंग व सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडा गरम तेल ओतावे. किसलेला गूळ व मीठ टाकून एकत्र करावे. कैरीच्या फोडी या मिश्रणात मिसळाव्यात. तेलाची फोडणी करून लोणच्यावर ओतून बरणीत भरून ठेवावे. अधूनमधून लोणचे हलवत रहावे.

पन्हे

साहित्य : कच्च्या कैरीचा गर १ किलो, मीठ १२० ग्रॅम, काळे मीठ ८० ग्रॅम, जिरे पावडर ४० ग्रॅम, पुदिना पाने २०० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड २० ग्रॅम, साखर ४५० ग्रॅम, सोडिअम बेन्झोएट १ ग्रॅम, पाणी गरजेनुसार.

कृती :

कैरी स्वच्छ धुऊन घ्यावी. समप्रमाणात कैरी व पाणी (१:१) घेऊन नरम होईपर्यंत शिजवावेत. गर काढून घ्यावा. सोडिअम बेन्झोएटव्यतिरिक्त सर्व घटक पदार्थ एकत्र बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण स्टील किंवा नायलॉनच्या चाळणीमधून गाळून मिश्रण मोजावे. चार किलो वजन होण्यासाठी उर्वरित पाणी मिसळावे.

सोडिअम बेन्झोएट थोड्या पदार्थामध्ये मिसळून नंतर संपूर्ण पन्ह्यामध्ये मिसळावे. तयार पन्हे काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पॅक करावे. पिण्यासाठी पन्हे तयार करताना एक भाग पन्हे व तीन भाग थंड पाण्यात मिसळून आस्वाद घ्यावा. सदर पन्हे साखर वगळून इतर घटक पदार्थ वापरून साखरविरहितसुद्धा करता येते.

सरबत

साहित्य : कैरी अर्धी वाटी, साखर ३ चमचे, पुदिना ५ ते ६ पाने, काळे मीठ पाव चमचा, चाट मसाला ४ ते ५ चिमूट, हिरवी मिरची अर्धी (तिखटानुसार), पाणी अर्धी वाटी.

कृती:

कैरीचे साल काढावे. छोटे चौकोनी तुकडे करावेत. त्यानंतर कैरीच्या फोडी साखर , पुदिना, काळ मीठ , चाट मसाला, हिरवी मिरची (चवीनुसार) व पाणी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

तयार मिश्रण काचेच्या ग्लासमध्ये गाळून घ्यावे. गरजेनुसार त्यात थंडावा येण्याकरिता बर्फ वापरू शकता.

आदिती बचाटे, ७८७५०३०२२१ - डॉ. विजया पवार, ९४२०६२६५३३

(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT