Ahilyanagar ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Ahilyanagar ZP : अहिल्यानगर ‘झेडपी’तील गैरव्यवहाराची पाच सदस्यीय समिती करणार चौकशी

ZP News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम विभाग वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. ठेकेदारांकडून एक टक्का रक्कम कपात करून ती शासनाला भरायची असते.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या कपात केलेली एका टक्का रक्कम शासनाकडे जमा न करता स्वतःच्या बॅंक खात्यात वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आता त्या प्रकाराची चौकशी करण्यात येत असून त्यासाठी पाच जणांची समिती नियुक्त केली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम विभाग वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. ठेकेदारांकडून एक टक्का रक्कम कपात करून ती शासनाला भरायची असते. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागात ठेकेदारांच्या कपात केलेल्या रकमा शासनाच्या तिजोरीत जमा न करता एका कर्मचाऱ्याने त्या स्वतःच्या बँक खात्यात परस्पर वळवून अफरातफर केल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

प्रथमदर्शनी सुमारे १३ लाखांचा हा घोटाळा निदर्शनास आला असला तरी घोटाळा झालेली रक्कम मोठी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी संबंधित लेखा कर्मचारी व लिपिक अशा दोघांवर निलंबनाची कारवाई केली.

मात्र हा गैरव्यवहार कसा केला, एकूण किती विभागाची, किती रक्कम अशा प्रकारे संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या खाती वळवून घेतली आहे, यात आणखी कोणी दोषी आहे का, बँक तपशील नेमके काय सांगतो, इत्यादींबाबत सखोल चौकशी करण्यासाठी येरेकर यांनी सूचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने अर्थ विभागातून मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य सहायक लेखाधिकाऱ्याच्या अध्यक्षेखाली चौकशी समिती केली असून, त्यात एकूण पाच सदस्य आहेत. समितीने दप्तर तपासणी केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांसह वरिष्ठांकडून लेखी म्हणणे मागवले जात आहे. साधारण महिनाभराच्या आत ही समिती अहवाल देईल असे सांगितले जात आहे.

चौकशीबाबत गोपनीयता

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, लेखा असे जेथे मोठी आर्थिक उलाढाल होते असे मोजके विभाग सातत्याने चर्चेत असतात. यापूर्वीही गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेत झाली होती. या वेळी मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकाराची चौकशी करून गुन्हा करण्याच्या पद्धतीसह अन्य बाबीची चौकशी करण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसतेय. याबाबत गुप्तता पाळली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT