Ahmednagar Zilla Parishad
Ahmednagar Zilla ParishadAgrowon

Nagar ZP : नगर जिल्हा परिषदेचे पन्नास लाखांचे अंदाजपत्रक सादर

Nagar ZP Budget : विविध नावीन्यपूर्ण योजना असलेले २०२४-२५ चे ५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी (ता. ११)सादर करण्यात आले.
Published on

Nagar News : विविध नावीन्यपूर्ण योजना असलेले २०२४-२५ चे ५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी (ता. ११)सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक असल्याने सर्वसाधारण सभा झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी हे अंदाजपत्रक सादर केले.

यावर्षीचे अंदाजपत्रक सादर करताना शिक्षण विभाग, पशुसंवर्धन आणि आरोग्यावर भर देण्यात आला. काही नावीन्यपूर्ण योजना अंदाजपत्रकात आहेत. जिल्हा परिषदेचे २०२४-२५ चे ५० कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक आहे. लोकनियुक्त मंडळ नसल्याने जिल्हा परिषदेचे सलग दुसरे अंदाजपत्रक सादर करावे लागले.

Ahmednagar Zilla Parishad
Nanded ZP Budget : नांदेड ‘झेडपी’चा २२ कोटी ३६ लाखांचा अर्थसंकल्प

अंदाजपत्रकात बीओटीवर शाळा, हवामान केंद्राबाबतची योजना गुंडाळण्यात आली. यंदा प्रशासक येरेकर यांनी नवीन योजनांमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याचे दिसते. क्यू आर हजेरीचा निर्णय क्रांतिकारी ठरण्याची चिन्हे आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांना धक्का न लावता त्यात वाढ केली आहे.

Ahmednagar Zilla Parishad
ZP Budget : सातारा जिल्हा परिषदेचे ४२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

कडबाकुट्टी, मोफत सायकल, पिठाची गिरणी, दिव्यांगांना घरकुले, शिलाई मशिन, व्यावसायिकांना तांत्रिक प्रशिक्षण, दूधकाढणी यंत्र, मुक्त संचार गोठ्यासारख्या योजनांचा नेहमीप्रमाणे लाभ मिळेल. शासनाकडून मिळणारे उपकर, सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क रक्कम, पाणीपट्टी आदी कर ग्राह्य धरून शिलकीसह हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

२०२४-२५चे मूळ अंदाजपत्रक

जमा बाजू

आरंभीची शिल्लक - ४५ लाख १६ हजार ७३२

जिल्हा परिषदेचा महसूल - ३८ कोटी २१ लाख २२ हजार ३१७

भांडवली जमा - ११ कोटी ३५ लाख ५६ हजार १००

खर्च बाजू

झेडपी महसुलातून - ३८ कोटी ६४ लाख ११ हजार

भांडवली खर्च - ११ कोटी ३५ लाख ५६ हजार १००

एकूण खर्च - ४९ कोटी ९९ लाख ६७ हजार १००

एकूण अखेरच्या शिलकीसह खर्च बाजू - ५० कोटी १ लाख ९५ हजार १४९

विभागनिहाय तरतूद

अ - प्रशासन १ कोटी ३४ लाख ६४ हजार

सामान्य प्रशासन - १ कोटी २ लाख ५५ हजार

शिक्षण - २ कोटी १ लाख ११ हजार

सा. बां. उत्तर - ३ कोटी ९५ लाख १३ हजार

सा. बां. दक्षिण - ६ कोटी ४५ लाख ८१ हजार

लघू पाटबंधारे - १ कोटी १० लाख १ हजार

ग्रामीण पाणी पुरवठा - २ कोटी ४० लाख ३ हजार

आरोग्य - ८५ लाख ३ हजार कृषी - ७७ लाख ६७ हजार

पशुसंवर्धन - १ कोटी ३० लाख १ हजार

समाजकल्याण - २ कोटी ४९ लाख ६ हजार

दिव्यांग कल्याण - ६० लाख १ हजार

महिला व बालकल्याण - १ कोटी २० लाख ६ हजार

ग्रामपंचायत - ८ कोटी ८० लाख ३ हजार

अर्थ विभाग - १ कोटी ३१ लाख ६ हजार ६८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com