Savitribai Phule Female Goat Breeding Company Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming Company : शेळीपालक महिलांची देशात पोहोचलेली कंपनी

Diwali Article 2024 : महिलांचे संघटन करून घरगुती स्तरावरील शेळीपालनाला सिन्नर (जि. नाशिक) येथील युवा मित्र संस्थेने व्यावसायिक रूप दिले. शास्त्रीयदृष्ट्या शेळीपालनाला त्यातून चालना दिली. त्यातूनच पुढे ‘सावित्रीबाई फुले महिला शेळी पालक उत्पादक कंपनी उदयास आली.

मुकूंद पिंगळे

Goat Farming : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणग्रस्त तालुका असल्याने येथील अनेक गावांना दुष्काळाचे चटके सोसावे लागतात. कधी खरीप हंगाम वाया जातो. तर कधी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमुळे शेती उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. जीवनाचा संघर्ष करताना पुरुष मंडळी तालुक्याच्या ठिकाणी रोजगारासाठी जातात.

महिलांना मात्र संधी असून नसल्यासारखी. काही महिला ‘एमआयडीसी’मध्ये भल्या सकाळी उठून कामावर जातात. त्यातून होणारी ओढाताण, मिळणारा आर्थिक परतावा कमी अशी परिस्थिती. या सर्व समस्या जाणून त्यावर उपाय शोधण्याचे काम सिन्नर येथील युवा मित्र संस्थेने २०१५ मध्ये हाती घेतले.

तालुक्यातील भूमिहीन, अल्पभूधारक, विधवा, परित्यक्ता, आर्थिक वंचित अशा सर्व स्तरातील गरजू महिलांसाठी शेतीपूरक व्यवसायाची व त्यातही शेळीपालनाची निवड केली. ‘महिला उपजीविका विकास कार्यक्रम’अंतर्गत शेळीपालनातील शास्त्रीय ज्ञान देऊन आपल्या पायांवर महिलांना उभे करणे हा प्रमुख उद्देश होता. महात्मा गांधी शेळीला गरिबाची गाय संबोधत. हीच बाजू विचारात घेऊन संघटित वृत्तीने सुरुवातीला ३० गावांमध्ये महिला संयुक्त दायित्व गटांची स्थापना करण्यात आली.

प्रकल्पाची यशस्वी सुरुवात

तालुक्यातील महिलांचे अर्थकारण शेळीच्या अवतीभवती होते. त्यामुळे या पारंपरिक कामकाजात व्यावसायिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज होती. त्या अनुषंगाने संस्थेने प्रकल्प आराखडा तयार केला. अर्थात, आर्थिक मदतीशिवाय वाटचाल शक्य नव्हती. त्या दृष्टीने संस्थेने ‘द नालंदा फाउंडेशन’कडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार महिलांना शेळ्या खरेदीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली.

मिळालेले अर्थसाह्य व स्वभांडवल यांची जुळवाजुळव करून महिलांनी दोन शेळ्या खरेदी केल्या. काही भागधारक महिलांना शेळीपालन शेड उभारण्यासाठी बिनव्याजी परतफेडीच्या तत्त्वावर आर्थिक मदत देण्यात आली. मदत प्राप्त झाल्याच्या तीन महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्षभराच्या आत ही रक्कम परत करणे अनिवार्य होते.

संस्थेच्या मदतीने हळूहळू कार्यक्रमाला गती मिळत गेली.त्यातूनच हजारो महिला व्यवसायाभिमुख व आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत झाली. पुरुषांच्या बरोबरीने कुटुंबात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला. या उपक्रमात ‘एचटी पारेख फाउंडेशन, ‘बजाज फिनसर्व्ह’, रंभा चॅरिटेबल ट्रस्ट आणि नालंदा फाउंडेशन यांचे आर्थिक साह्य मोलाचे ठरले.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT