Beed News : दिवाळीचा फराळ अजून संपलेला नाही आणि आता मजुरांचे ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे स्थलांतर सुरू झाले आहे. ज्येष्ठ व्यक्तींना घरात ठेवून कुटुंबकबिला घेऊन मजूर ट्रक, ट्रॅक्टरमधून रवाना होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे महामंडळ आणि शासनाच्या योजनांची भलीमोठी यादी असली, तरी ऊस तोड मजुरांच्या संख्येत काहीही घट झालेली नाही..बीड जिल्हा हा ऊस तोड मजूर पुरविणारा जिल्हा म्हणून अनेक वर्षांपासून ओळखला जातो. राजकारण्यांसाठी ऊस तोड मजूर हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो; मात्र मजुरांच्या आयुष्यात अजूनही सुखाची पहाट आलेली नाही. .Sugarcane Season : विनापरवाना गाळप बंद करा.जिल्ह्यातील बीड, परळी, आष्टी, केज, धारूर, गेवराई, पाटोदा आणि शिरूर कासार या तालुक्यांतील सर्वाधिक ऊस तोड मजूर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि अगदी उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतात..डोंगराळ भाग, सिंचन सुविधांचा अभाव, कमी पाऊस आणि परिणामी शेतीची परवड, रोजगाराच्या संधींचा अभाव या कारणांमुळे बीड जिल्ह्यातील मजूर ऊस तोडीकडे वळले आणि ती आता परंपराच बनली आहे. विशेष म्हणजे, हजारो घोषणांनंतरही ऊस तोड मजुरांच्या हातातील कोयता आजही खाली पडलेला नाही. दरवर्षी अडीच ते साडेतीन लाखांहून अधिक मजूर कारखान्यांकडे स्थलांतरित होतात..Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज.महिलांचेही प्रमाणयंदा मुसळधार पाऊस झाला, ओल्या दुष्काळाची चर्चा आहे, तरीही या स्थलांतरात काही फरक पडलेला नाही. कारण अनेक मजुरांशी आधीच करार झालेले असतात. घरातील जबाबदारी, कर्जाचा भार आणि उदरनिर्वाहाची धडपड यामुळे महिलाही पुरुषांसोबत स्थलांतरित होताना दिसतात..आरोग्याचा प्रश्नअनेक ऊस तोड मजूर महिला ‘पाठीवर बाळ आणि गर्भातही बाळ’ घेऊन रात्री-अपरात्री ऊस तोडीस जाताना दिसतात. इकडे दिवाळी सुरू असताना, तिकडे ऊस तोड मजुरांचा कुटुंबकबिला घेऊन ट्रक आणि ट्रॅक्टरमधून कारखान्यांकडे प्रवास सुरू आहे. महिलांच्या महावारीच्या अडचणी, आरोग्यविषयक समस्या यांवर चर्चा नेहमी होते, पण त्यांची सोडवणूक मात्र अजून झालेली नाही. अनेकदा झोपड्यांमध्ये महिला एकट्या असतात, त्यांच्या संरक्षणाचाही प्रश्न गंभीर आहे. गर्भवती महिलांना कुठलाही वैद्यकीय उपचार मिळत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.