Alan Turing: अतुल कहाते यांचे पुस्तक ‘एआय’चा जनक ॲलन ट्युरिंग’ वाचकांना १९३०–४० च्या काळातील एका महान गणितज्ञाचे जीवन आणि त्याच्या संशोधनाची कहाणी सांगते. बाल्यावस्थेतील उत्सुकता, भावनिक बदल, दुसऱ्या महायुद्धातील योगदान आणि संगणकीय तंत्रज्ञानातील मूलभूत शोध या पुस्तकातून समजून येतात.