Goat Farming : बंदिस्त, मुक्त पद्धतीने शेळी संगोपनावर भर

Goat Rearing : संतोष सोमोशी (रा. शिरोली खुर्द ता. जुन्नर) हे मागील ८ ते ९ वर्षांपासून सोजत जातीच्या शेळ्यांचे संगोपन करत आहेत. शेळीपालन व्यवसायाला ‘सात्त्विक गोट फार्म’ असे नाव त्यांनी दिले आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

शेतकरी नियोजन : शेळीपालन

शेतकरी : संतोष सोमोशी

गाव : शिरोली खुर्द, ता. जुन्नर, जि. पुणे

एकूण शेळ्या ; २५

संतोष सोमोशी (रा. शिरोली खुर्द ता. जुन्नर) हे मागील ८ ते ९ वर्षांपासून सोजत जातीच्या शेळ्यांचे संगोपन करत आहेत. शेळीपालन व्यवसायाला ‘सात्त्विक गोट फार्म’ असे नाव त्यांनी दिले आहे. शेळीपालनासाठी बंदिस्त व मुक्त पद्धतीने नियोजनबद्ध रचना, स्वच्छ वातावरण यासह व्यवस्थापन आणि नियोजनावर भर दिला जातो. विक्रीसाठी ग्राहकांचे नेटवर्क त्यांनी उभारले आहे.

संतोष सोमोशी यांची सात एकर शेती आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, कांदा, सोयाबीन तसेच फुलपिकांची लागवड करण्यावर भर दिला जातो. शेतीला पूरक म्हणून त्यांनी शेळी व बोकड संगोपनास सुरुवात केली. राजस्थान येथून सोजत जातीच्या शेळ्या आणि नर पिल्ले आणून व्यवसायास सुरुवात केली.

Goat Farming
Goat Rearing : पावसाळ्यात शेळ्यांना जपावे लागते...

वयानुसार शेडमध्ये कप्पे

शेळ्यांसाठी ४३ बाय ३५ फुटांचे अर्धबंदिस्त, तर ६० बाय ३३ फुटांच्या मुक्त संचार शेडची उभारणी केली आहे.

मोठ्या शेळ्या आणि बोकड यांच्यासाठी स्वतंत्र विभाग केले आहेत. त्यामुळे मोठ्या शेळ्या आणि लहान करडांचे योग्यरीत्या संगोपन करण्यास मदत होत आहे.

यामध्ये वयानुसार प्रत्येक शेळीची आणि पिल्लांची व्यवस्था केली आहे. साधारणपणे मोठे ३, मध्यम २ आणि लहान दोन कप्पे केले आहेत.

या व्यवस्थेमुळे योग्य पद्धतीने खाद्य, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापन करणे अधिक सोपे झाली आहे.

व्यवस्थापनातील बाबी

दररोज सकाळी ८ वाजता शेळ्यांना बंदिस्त शेडमधून मुक्तसंचार शेडमध्ये सोडले जाते.

मुक्तसंचार शेडमध्ये सोडल्यानंतर गोळीपेंडचा खुराक दिला जातो. त्यानंतर शेडची स्वच्छता केली जाते.

साधारण १० वाजता चारा आणि पाणी दिले जाते. पुन्हा शेळ्यांना बंदिस्त शेडमध्ये आणून बांधले जाते.

संध्याकाळी चार वाजता पुन्हा मुक्त संचार शेडमध्ये सोडले जाते.

Goat Farming
Goat Cluster : रांजणीतील ‘गोट क्लस्टर’ हलवले साताऱ्यातील दहिवडीत

चारा व्यवस्थापन

वर्षभर ओला आणि सुका चारा शेळ्यांना देण्यावर भर दिला जातो. त्यासाठी बांधावर सुबाभुळीची ५० झाडे तसेच तुती, साग, शेवरी आणि शेवगा यांची प्रत्येकी पाच झाडे लावली आहेत. याशिवाय शेतामध्ये लसूण घास, नेपिअर गवत यांची अर्धा एकरावर लागवड केली आहे. झाडांचा पाला दररोज हिरवा चारा म्हणून उपयोगात येतो. सुक्या चाऱ्यात कडबा, सोयाबीन, हरभरा, तुरीचा भुस्सा दिला जातो.

लसीकरणावर भर

शेळ्यांना वर्षभर वेगवेगळ्या आजारांसाठी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्यामुळे शेळ्या आजारास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.

‘पीपीआर’, आंत्रविषार, लाळ्या खुरकूत, धनुर्वात यांचे वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केले जाते.

तीन महिन्यांतून एकदा तोंडावाटे जंतनाशकाची मात्रा दिली जाते. ही मात्रा शेळी- बोकडाच्या वय आणि वजनानुसार ठरविली जाते.

भूक आणि वजन वाढीसाठी वयानुसार टॉनिक दिले जाते.

दैनंदिन आहारात मिनरल मिश्रण दिले जाते.

विक्री व्यवस्था

संगोपन १० ते १२ महिने केल्यानंतर आणि वजन ७० ते १०० किलोपर्यंत झाल्यानंतर बोकड विक्री योग्य होते. आळेफाटा बाजार आणि स्थानिक पातळीवरच विक्री होते.

दोन दाती किंवा त्याहून अधिक दात असलेल्या बोकडांना बकरी ईदला विशेष मागणी असते. बकरी ईदच्या वेळी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे परिसरातील व्यापारी खरेदीसाठी थेट शेडवर येतात.

संतोष सोमोशी, ९८५०६०२५९८

(शब्दांकन : गणेश कोरे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com