Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Farmers' Demand for Cotton Procurement : हमीभावाने कापूस खरेदीसाठी कापसातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १२ टक्क्यांवरून १५ टक्‍के गृहीत धरण्यात यावे, अशी मागणी उत्पादकांमधून होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : सोयाबीन प्रमाणेच कापूस उत्पादकांना देखील ओलाव्याच्या कारणामुळे कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस खरेदीसाठी कापसातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १२ टक्क्यांवरून १५ टक्‍के गृहीत धरण्यात यावे, अशी मागणी उत्पादकांमधून होत आहे.

निवडणुकीत मुद्दा तापायला लागल्यामुळे केंद्र सरकारने हमीभावाने खरेदीसाठी असलेल्या एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनसाठी ओलाव्याचे प्रमाण १२ टक्‍क्यांवरून १५ टक्‍के करण्याचा निर्णय नुकताच घेतला. सोयाबीनच्या धर्तीवरच ओलाव्याआड बाजारात कापसाला देखील अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कापूस खरेदीकरिता सोयाबीनप्रमाणे १५ टक्‍के ओलाव्याचा निकष लावण्यात यावा, अशी मागणी कापूस उत्पादकांमधून होत आहे.

देशभरात सध्या भारतीय कापूस महामंडळाकडून कापसाची खरेदी होत आहे. त्याकरिता मध्यम धाग्याच्या कापसाकरिता ७७२१, तर लांब धाग्याच्या कापसाकरिता ७५२१ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु बाजारात ओलावा अधिक असल्याचे कारण देत सरसकट ७००० ते ७२०० रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे.

हमीभावापेक्षा प्रति क्‍विंटल ७०० ते ८०० रुपये कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेता सोयाबीनच्या धर्तीवर कापसातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १२ टक्‍क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत गृहीत धरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका

मॉन्सूनोत्तर पावसामुळे अखेरच्या क्षणी कापूस भिजला; परिणामी त्यात ओलावा आहे. असा कापूस एकाच गंजीत मिसळल्यास उर्वरित कापसाची प्रतही खराब होण्याची शक्‍यता असल्यामुळे तो कापूस विकण्यास शेतकऱ्यांनी भर दिला आहे. या कापसाची कमी दरात खरेदी केली जाते.

विदर्भात १७ हजार क्‍विंटल खरेदी

यंदाच्या हंगामात सीसीआयकडून कापसाची खरेदी केली जात आहे. एफएक्यू दर्जाचाच कापूसच शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. विदर्भात ३५ केंद्रांच्या माध्यमातून १७६०० क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

बोंडात कापूस फुटल्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस बरसला. त्यामुळे कापूस भिजला, प्रतही खराब झाली. अशावेळी केंद्र सरकारने कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीनप्रमाणे कापूस उत्पादकांकरिता ओलाव्याचा निकष १२ टक्‍क्यांवरून १५ टक्‍के करण्याची गरज आहे.
गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक
कापूस वेचणीच्या वेळी पाऊस झाला. कापसाच्या बोंडात राहिलेला कापूस तसाच वाळल्यास सोयीचे ठरते. परंतु मॅन्युअली ते वाळविणे फारच अवघड काम आहे. त्यामुळे कापसातील ओलाव्याकरिता १५ टक्‍के प्रमाण गृहीत धरल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, निंभारा, ता. बार्शीटाकळी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT