Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सोलापुरात ९५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा; १ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण

Agricultural Insurance : रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १६ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.

Team Agrowon

Solapur News : रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १६ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून, या विम्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित झाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात यंदा ४ लाख १३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. साधारण ८९.७४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत जनजागृती होत आहे. त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. विम्यासाठी आता हप्ताही केवळ एक रुपया असल्यानेही त्याला प्रतिसाद मिळत आहे.

या हंगामातील विम्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. पण त्यानंतर ती एकदिवसाने वाढवून १६ डिसेंबरपर्यंत केली होती. या दिवसअखेर जिल्ह्यात ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी १ लाख ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा उतरला आहे.

त्यामध्ये बार्शी तालुक्यात सर्वाधिक २३ हजार ५७३ शेतकऱ्यांनी, त्यानंतर सांगोल्यातून १९ हजार ३३१, तर माढ्यातून १५ हजार ९९० शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तर सर्वांत कमी पंढरपूर तालुक्यातून केवळ ८९९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.

तालुकानिहाय विम्याचे संरक्षित क्षेत्र आणि कंसात शेतकरी संख्या

अक्कलकोट-८,००४ (४,३२४), बार्शी-३७,५०१ (२३,५७३), करमाळा-१०,२८५ (७,७०२), माढा-२३,२१९ (१५,९९०), माळशिरस-४,५५७ (३,६९४), मंगळवेढा-१८, १८६ (१०,६८८), मोहोळ- ६,१६० (३८३५), पंढरपूर-१,०८३ (८९९), सांगोला-२५,८१५ (१९,३३१), उत्तर सोलापूर-४,५०६ (२६६९), दक्षिण सोलापूर-४,५३९ (२४१९)- एकूण- ९५१२४ (१ लाख ४३ हजार ८६०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices: कर्नाटकात कांद्याचे भाव गडगडले, हमीभाव देण्याची मागणी

Rabi Season Preparation : पीक प्रात्यक्षिके ७३७ गावांमध्ये होणार

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे रखडले

Agrowon Podcast: आल्याच्या किमतीत सुधारणा; वांग्याची आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, संत्र्याच्या किमतींवर दबाव, केळीच्या किमती वाढल्या

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र होणार

SCROLL FOR NEXT