Fruit Crop Insurance : फळपीक विम्याच्या तपासणीसाठी पथक रवाना

Inspection Team Investigation : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत दोन लाखांहून अधिक प्रस्तावांची नोंदणी झाली आहे. यातील बोगस प्रस्तावांची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झाले आहे.
Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत दोन लाखांहून अधिक प्रस्तावांची नोंदणी झाली आहे. यातील बोगस प्रस्तावांची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झाले आहे.

आंबिया बहर (रब्बी) २०२४ मध्ये विम्यासाठी फळबागांची सर्वाधिक नोंदणी जळगाव जिल्ह्यात झाली असून, तो आकडा ७२ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या हंगामात हीच नोंदणी जळगावमध्ये ५५ हजारांच्या आसपास होती. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या हंगामात पथके पाठवून चौकशी केली त्या जिल्ह्यांमध्ये यंदा नोंदणी घटली आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा परतावा मिळणार

उदाहरणार्थ, अहिल्यानगरमध्ये गेल्या हंगामात ३२०० प्रस्ताव आले होते. यंदा केवळ ७३० प्रस्ताव आले आहेत. फळपीक विम्यात सर्वाधिक घोटाळे बीड जिल्ह्यात होतात. तेथे गेल्या हंगामात ५१०० प्रस्ताव आले होते; परंतु आता हीच संख्या ११०० वर आली आहे. जालना जिल्ह्यातील प्रस्तावांची संख्यादेखील ४८ हजारांवरून १४ हजारांवर आली आहे. बागांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा कंपन्यांकडे विमा हप्त्यापोटी १४९ कोटी रुपये भरलेले आहेत.

तसेच राज्याने ३९१ कोटी रुपये, तर केंद्राने २९७ कोटी रुपये विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यांना दिले आहेत. विमाधारकांच्या फळबागांमध्ये केळी, काजू, द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब व स्ट्रॉबेरीचा समावेश आहे. यंदा शेतकऱ्यांनी १.५६ लाख हेक्टरच्या फळबागांचा विमा उतरवला असून या बागांची विमा संरक्षित रक्कम १४९४ कोटींच्या पुढे आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : आंबा-काजू विमा योजेनेकडे १ हजार बागायतदारांची पाठ

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, आंबिया बहरातील विमा प्रस्तावांची नोंदणी २.१२ लाखाच्या पुढे गेली असली तरी यातील हजारो प्रस्ताव बोगस असू शकतात. गेल्या हंगामात मृग बहरात ७३ हजार ७९० प्रस्ताव आले होते. राज्यभर सखोल चौकशी केली असता यातील १९ हजार ११६ प्रस्ताव बोगस आढळले आहेत. यात १४ हजार प्रस्तावांमध्ये कोणतीही फळबाग जागेवर नव्हती. तरीदेखील खोटी कागदपत्रे जोडून प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.

‘सीएससी’ चालकाच्या भूलथापांना बळी पडू नका

तुम्हाला जास्त विमा भरपाई मिळवून देतो, असे सांगत राज्याच्या विविध भागांत सार्वजनिक सुविधा केंद्रचालक (सीएससी) शेतकऱ्यांना खोटे प्रस्ताव दाखल करण्यात भाग पाडतात. शेतकऱ्यांनी सीएससीचालकाच्या भूलथापांना बळी पडू नये. यामुळे आर्थिक नुकसान होऊन कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com