Sangli DCC Bank
Sangli DCC BankAgrowon

Sangli DCC Bank : पावणेतीन लाख कर्जदार शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा बँकेने विमा उतरवला

Cooperative Bank Loan : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा अपघाती विमा बँकेच्या वतीने उतरवण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी वार्षिक सभेत केली होती.
Published on

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा अपघाती विमा बँकेच्या वतीने उतरवण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी वार्षिक सभेत केली होती. त्यानुसार संबंधित विमा कंपनीला २ लाख ७० कर्जदार शेतकऱ्यांच्या विम्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने चार कोटींचा हप्ता देण्यात आला.

बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांच्या हस्ते विमा कंपनीला बँकेच्या वतीने धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक मोहनराव कदम, दिलीप पाटील, विशाल पाटील, बँकेच मुख्य कार्यकारी शिवाजीराव वाघ व अन्य अधिकारी यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : शेतकरी ‘ओटीएस’ योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ शक्य

जिल्हा बँकेशी संलग्न विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्जदार शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरण्याचा निर्णय बँकेच्या वार्षिक सभेत जाहीर करण्यात आला होता. कोणत्याही अपघातामुळे मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व, वीज पडून अथवा विजेच्या धक्क्याने मृत्यू, सर्पदंश यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यातील सभासद शेतकऱ्यांचा मृत्यू होणे तसेच काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व येणे अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अपघाती विम्याचे सुरक्षाकवच असणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला.

Sangli DCC Bank
Sangli DCC bank : जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच

जिल्ह्यातील सर्व विकास सोसायटीच्या जवळपास २ लाख ७० हजार कर्जदार सभासदांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. दोन लाख रुपयांचा ग्रुप विमा तीन वर्षे कालावधीसाठी असून त्यासाठीचा विमा हप्ता बँक स्वतः भरणार आहे. त्यानुसार या हप्त्याचा ४ कोटी १ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा धनादेश विमा कंपनीला देण्यात आला.

विमा संरक्षणातील ठळक बाबी

प्रतिशेतकरी २ लाख रुपयांचा विमा

 संरक्षण कालावधी ३ वर्षे

अपघाताने मृत्यू झालेल्यांच्या दोन पाल्यांना प्रत्येकी एकवेळ २५ हजार शैक्षणिक सहाय्य

दोन्ही डोळे गेल्यास १०० टक्के

दोन्ही हात-पाय १०० टक्के

एक हात, एक डोळा १०० टक्के

एक डोळा ५० टक्के

एक हात किंवा पाय ५० टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com