Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Market : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीत ९० हजार आंबा पेट्या

Mango Season : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील बाजार समितीत कोकणातील हापूसच्या सुमारे ९० हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे विशेष मुहूर्त असल्यामुळे हापूस आंबा विक्रीसाठी वाशीला आला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील बाजार समितीत कोकणातील हापूसच्या सुमारे ९० हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे विशेष मुहूर्त असल्यामुळे हापूस आंबा विक्रीसाठी वाशीला आला आहे. निर्यातीच्या गोंधळामुळे यंदा हापूसचे दर गतवर्षीपेक्षा कमी आहेत. सध्या पाच डझनच्या पेटीचा सर्वाधिक दर २३०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गुढीपाडव्यापासून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आला. यंदा चार ते पाच टप्प्यात आंब्याला मोहर आला. उत्पादनही मुबलक आले आहे. नवी मुंबईच्या मार्केटमध्ये १ लाख पेटी आंबा दाखल झाला. त्यात ४७ हजार पेटी कोकणातील हापूसच्या तर ५३ हजार पेटी ही अन्य राज्यातील आंब्याच्या होत्या.

गुरुवारी (ता. ९) सकाळी अपेक्षेपेक्षा कमी पेट्या वाशीत दाखल झाल्या. गुरुवारी ८२ हजार ६०८ पेट्यांपैकी कोकणातील ४३ हजार ३३६ तर अन्य राज्यातील ३९ हजार २७२ पेटी आंबा होता. देशभरातील सर्व प्रसिद्घ मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसने छाप टाकली आहे.

आखाती देशातील हापूसच्या निर्यातीत अडचणी आल्यामुळे यंदा जम्मू काश्मीर राज्यातही हापूस विक्रीला पाठवला गेला. दुबई बाजारात रत्नागिरी हापूसची पेटी ५ हजार रुपये दराने विकली जात आहे.

मेच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा कमी असल्याचे बागायतदारांनी सांगितले. त्यामुळे वाशीत अक्षय तृतीयेला गेलेल्या पेट्यांच्या संख्येवर परिणाम झाला. त्याचा फायदा हापूसचे दर स्थिरावण्यासाठी होऊ शकतो.

मुहूर्त साधून हापूसची आवक वाशी बाजारात सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहराचे उत्पादन १५ मे नंतर हाती येईल. या आठवड्यात उत्पादन कमी आहे. मात्र दर्जेदार आंब्याला दर चांगला मिळत आहे.
प्रदीप सावंत, आंबा बागायतदार
यंदा वैशाख वणव्यातील उन्हाच्या झळा लवकर जाणवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम निश्‍चितच हापूसवर दिसून येतो. फळ लवकर तयार होत आहे. या वर्षी अक्षय तृतीयेला गतवर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत. वातावरणातील बदलांमुळे संपूर्ण हंगामात आंबा मुबलक असला तरीही दर्जेदार फळांची आवक कमी राहिली.
अशोक हांडे, आंबा व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT