Mango Market : अक्षय तृतीयेनिमित्त पुणे बाजारात विविध आंब्याची रेलचेल

Team Agrowon

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणापासून आंब्याला मागणी वाढत जाते. येत्या शुक्रवारी (ता. १०) हा सण असून त्यानिमित्ताने पुणे बाजार समितीमधील आंबा बाजार फुलला आहे.

Mango Market | Agrowon

पहिल्या टप्यात दररोज दोन- तीन हजार पेट्या प्रमाणात होणारी आवक दहा हजार पेट्यांपर्यंत पोहोचली आहे.

Mango Market | Agrowon

सुट्ट्यांचा हंगाम असल्याने मागणी व खरेदीही वाढली आहे. सध्या प्रति डझन ५०० ते ८०० रुपये दर आहे.

Mango Market | Agrowon

पुणे बाजार समितीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड आणि रायगड जिल्ह्यांतून सध्या दररोज अंदाजे १० ते ११ हजार पेटी आवक झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ती १० टक्क्यांनी जास्त आहे. दरांमध्येही १० टक्के वाढ आहे.

Mango Market | Agrowon

बाजारात कच्चा मालाच्या चार ते आठ डझनाच्या प्रति पेटीला १००० ते २५०० रुपये दर आहे. तयार मालाला दर्जा आणि आकारानुसार ४०० ते ८०० रुपये प्रति डझन दर आहे.

Mango Market | Agrowon

चार- सहा डझनची पेटी तीन- चार हजार रुपयांना घेण्याऐवजी ६०० ते ८०० रुपयांचा एक ते दीड डझनाचा बॉक्स घेण्याकडे मध्यमवर्गीय कुटुंब प्राधान्य देत आहे.

Mango Market | Agrowon

कर्नाटक हापुसच्या चार ते ५ डझनांच्या कच्चा मालाच्या पेटीला दर्जा आणि आकारानुसार ८०० ते १४०० रुपये दर मिळत आहे.

Mango Market | Agrowon