Landslides Spots Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Landslides Spots Kolhapur : 'वायनाड'च्या वाटेवर कोल्हापूर ?, भूस्खलनाच्या धोक्यावर ८९ ठिकाणे

sandeep Shirguppe

Landslide : मागच्या ८ दिवसांपूर्वी केरळ राज्यातील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन ४०० पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला. अद्यापही तेथील गावांमध्ये बचावकार्य सुरूच आहे. १५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेली ८९ ठिकाणे वायनाडच्या घटनेमुळे समोर आली आहे. जिल्ह्यात मागच्या काही वर्षांत डोंगर माथ्यावरील सपाटीकरण, उत्खनन, डोंगर फोडून केलेली बांधकामे, बेसुमार वृक्षतोड सर्रास सुरू आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

पावसाळा सुरू झाला की दरड कोसळण्याच्या घटना नित्याच्याच घडतात. मात्र, हे प्रकार असेच सुरू राहिले तर भूस्खलनाची मोठी घटना होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीसह इतर कारणांमुळे येथे भूस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे. भूगर्भ शास्त्र संशोधक व अभ्यासकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला अहवालही सादर केले आहेत.

संशोधकांच्या अभ्यासानुसार काही वर्षांत डोंगर माथ्यावरील बेसुमार वृक्षतोड, रस्ते आणि अवैध बांधकामे यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठून पुढे ते झिरपत झिरपत खालच्या बाजूवर दबाव टाकत राहते. उन्हाळ्यात झाडे नसल्याने जमीन मोठ्या प्रमाणात तापून पहिल्या पावसात त्यात भेगा पडतात. त्यावर मोठा पाऊस झाला की, हजारो टन पाणी मुरत ते खालच्या बाजूला वाहून जाते.

यामुळे येथील जमिनी व डोंगर उताराची भरपूर झीज व विदारण होते. तसेच ही जमीन क्षतिग्रस्त आणि भुसभुशीत झाल्यामुळे त्याची स्थिरता संपून जाऊन सोबत दगड, उरली सुरली झाडे आणि बांधकामे वाहून जाऊन प्रचंड असे भूस्खलन होते. त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये जमिनीच्या मूळ रचनेत सुरुंग लावून किंवा भूमिउपयोजनेत बदल केले आहेत. तसेच पाण्याचे मूळ प्रवाह बदलून, ते मुजवून त्यात बांधकामे झाली आहेत. अशा कारणांमुळे भूस्खलनाचे धोके अधिक वाढले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ म्हणाले कीी, भूस्खलनाला प्रमुख कारण हे अतिवृष्टी आहे. त्याचबरोबर नैसर्गिक डोंगर उतारांवर बांधकामे करणे, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बदलणे अशी अनेक कारणेही आहेत. हा धोका टाळण्यासाठी भूस्खलन परिसरातील डोंगर उतारांवरील बांधकामांसह ओढे, नाले वळविणे टाळले पाहिजे.

याबाबत भूमाहितीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर अमोल जरग यांच्या माहितीनुसार, कोणत्याही प्रदेशाची आपत्ती प्रवणता ठरविताना विकासकामामुळे निसर्गाचा समतोल किती बिघडेल याचे नेमके मूल्यमापन होणे गरजेचे आहे तसेच भूमाहितीशास्त्राच्या सहाय्याने भूस्खलन प्रवण नकाशे तयार करणे हेही महत्त्वाचे आहे. यामुळे आपण कमीत कमी जीवितहानी आणि वित्तहानी रोखू शकतो.

जिल्ह्यातील भूस्खलनाची गावे तालुकानिहाय

राधानगरी ३१, शाहूवाडी २०, भुदरगड ११, पन्हाळा ०९, करवीर ०४, आजरा ०४, गगनबावडा ०४, कागल ०३, गडहिंग्लज ०१, हातकणंगले ०१, चंदगड ०१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

Nuksan Bharpai : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५४८ कोटींवर निधीची गरज

Land Dispute : कोट्यवधींच्या सरकारी जमिनीची परस्‍पर विक्री

Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

SCROLL FOR NEXT