Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

Kharif Season: पुणे विभागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्यांना चांगला वेग आला. आता पेरण्या अंतिम टप्प्यात असून भात लागवडीही वेगात सुरू आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पुणे विभागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्यांना चांगला वेग आला. आता पेरण्या अंतिम टप्प्यात असून भात लागवडीही वेगात सुरू आहेत. सध्या खरिपातील सरासरीच्या १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टरपैकी ११ लाख १३ हजार १५२ हेक्टर म्हणजेच जवळपास ८९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पुढील पंधरा दिवसांत पेरण्या उरकण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे विभागात मागील सप्ताहामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. याअगोदर जवळपास दीड महिना चांगला पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये ७ जुलैला ६५.३ मिलिमीटरची नोंद झाली. तर एक जून ते १० जुलै या कालावधीत चांगल्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

यामध्ये जूनमध्ये अहिल्यानगरमध्ये सरासरीच्या १०८.२ मिलिमीटरपैकी ८०.२ मिलिमीटर म्हणजेच ७४ टक्के, पुणे जिल्ह्यात १७६.२ पैकी २५०.० मिलिमीटर म्हणजेच १४३ टक्के, सोलापूरमध्ये १०२.५ पैकी ६५.० मिलिमीटर म्हणजेच ६३ टक्के पाऊस झाला आहे. तर १ ते १० जुलै या कालावधीत नगरमध्ये सरासरीच्या ९७.५ पैकी २७.८ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ३०९.३ पैकी १०४.४ मिलिमीटर, तर सोलापुरात सरासरीच्या ९४.८ पैकी १३.४ मिलिमीटर पाऊस पडला.

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील आंतर मशागतीच्या कामे सुरू आहेत. अकोले तालुक्यात भात पीक पुनर्लागवडी वेगात सुरू असून पीक उगवण अवस्थेत आहे. बाजरी, मका पिकांची उगवण चांगली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन व कापूस पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. अकोले तालुक्यामध्ये रोपवाटिका प्रक्षेत्रावर १८३१.० हेक्टर क्षेत्रावर भात रोपे तयार करण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्ह्यात पिकांमध्ये आंतरमशागत, खुरपणीची कामे सुरू आहेत. भात पिकाच्या पुनर्लागवडीस सुरुवात झाली आहे. पेरणी झालेल्या बाजरी पिकांची वाढ चांगली आहे. मका, मूग, सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकांची उगवण व वाढ चांगली आहे. त्याचबरोबर पूर्व पट्ट्यातील बारामती तालुक्यात कापूस पिकाचीही लागवड बऱ्यापैकी वाढू लागली आहे.

मागील दोन वर्षांपासून कापसाची लागवड वाढती आहे. सोलापूरमध्ये बाजरी पिकांची उगवण चांगली असून पीकस्थिती उत्तम आहे. मका पिकांची पीकस्थिती समाधानकारक आहे. मूग, उडीद, तूर पीक उगवण, सोयाबीन पीक उगवणी ते वाढीची परिस्थिती चांगली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT