Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : धाराशिव जिल्ह्यात ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी

Kharif Season : धाराशिव जिल्ह्यात जूनअखेर सरासरी ८६.४६ टक्के क्षेत्रांवर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची आहे.

Team Agrowon

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात जूनअखेर सरासरी ८६.४६ टक्के क्षेत्रांवर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची आहे. सोयाबीनच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी १२७ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. पेरणीनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना वाढीसाठी फायदा झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेर अवघ्या १५ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली होती.

यंदा मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनीही लगबगीने पेरणी उरकून घेतली. त्यानंतर सतत पाऊस होत राहिला. त्याचा फायदा पिकांच्या उगवणीसाठी व वाढीसाठी झाला. गेल्या वर्षी पावसाला विलंब झाला होता. त्याचा परिणाम पेरणीवर होऊन जूनअखेरपर्यंत केवळ १५ टक्केच क्षेत्रांवर पेरणी झाली होती. यंदा मात्र जूनअखेरपर्यंत ८६.४६ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे.

जिल्‍ह्यात खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र पाच लाख चार हजार ७३६ हेक्टर आहे. यापैकी जूनअखेर चार लाख ३६ हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. प्रस्तावित क्षेत्राच्या सरासरी ८६.४६ टक्के क्षेत्रांत पेरणी झाली आहे. अपेक्षेप्रमाणे यंदाही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सोयाबीनसाठी प्रस्तावित क्षेत्र दोन लाख ८४ हजार ३०० हेक्टर होते. जूनअखेरपर्यंत तीन लाख ६१ हजार १४५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

प्रस्तावित क्षेत्राच्या १२७ टक्के क्षेत्रांवर ही पेरणी झाली आहे. पेरणीनंतरही जिल्ह्याच्या बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस झाला. त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होत आहे. उडदाचे प्रस्तावित क्षेत्र ४५ हजार ७९ हेक्टर असून, ३१ हजार ८७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाचे क्षेत्र २३ हजार २८ हेक्टर असून, आठ हजार ५५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन, उडीद, मूग ही तिन्ही पिके नगदी पिके समजली जात असल्याने व या पिकांची तीन ते साडेतीन महिन्यांत काढणी होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ही पिके घेण्याकडे खरीप हंगामात असतो.

पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र, कंसात टक्के

भात : एक हजार ८८१ (एक टक्का), खरीप ज्वारी : सात हजार ५७० (सहा टक्के), बाजरी : नऊ हजार ८१६ (दोन टक्के), मका : २२ हजार ३१९ (२० टक्के), मूग : २३ हजार २८ (३७ टक्के), उडीद : ४५ हजार ७९ (७१टक्के).

उसाची लागवड १२ टक्केच

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ७४ हजार २७५ हेक्टर असून, आठ हजार ७५४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरी १२ टक्केच क्षेत्रावर आतापर्यंत ऊस लागवड झाली आहे. यंदा उसाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Forest Area : राज्याचे वनक्षेत्र आकसत असल्याने चिंतेत भर

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीमधील रस्ते काँक्रीट निविदा घोटाळा

Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र

Sugar Export : साखर निर्यातीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT