Agriculture Sowing : पावसाच्या आशेवर कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरणीला वेग

Rain Alert : नागपूर जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिना संपला असताना अद्यापही जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिना संपला असताना अद्यापही जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पण लांबत असलेल्य पावसामुळे भात वगळता कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आजवर एकूण नियोजित क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ३६ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली.

Agriculture Sowing
Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ८० टक्के पेरणी

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरील क्षेत्राचे नियोजन केले आहे. गेल्या काही वर्षांतील कापसाचे वाढते क्षेत्र व मिळणारा भाव लक्षात घेता यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख २५ हजार हेक्टर इतके नियोजित आहे. कापूस, तूर, सोयाबीन, मका अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीचा सपाटा सुरू केला आहे. परंतु धानाचे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस लांबल्यास त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

आजवर जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापसाची नियोजित क्षेत्राच्या १.१० लाख हेक्टर, भाताची २३१ हेक्टर, तुरीची २२ हजार १२७ हेक्टर व सोयाबीनची ३४ हजार ९१२ हेक्टर, अशी एकूण नियोजित क्षेत्राच्या १ लाख ६७ हजार ९१० हेक्टरवर म्हणजेच ३५.९३ टक्के पेरणी आटोपली आहे.

असे आहे पीकनिहाय नियोजन

पीक नियोजित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)

सोयाबीन ९०,००० ३४,९१२

तूर ६१,००० २२,१२७

मका ४००० ४६२

भात ९५,००० २३१

भुईमूग १२३३ ११८

कापूस २ लाख २५ हजार १ लाख १० हजार

मुग ३०० २९

उडीद ३०० १८

ज्वारी १००० ७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com