Kharif Area Khandesh agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Area Khandesh : खरिपाचे शहाद्यात ८६ हजार हेक्टर क्षेत्र

Kharif Season : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे मिळण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Khandesh : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे मिळण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कृषी विभागाकडून खरीप पेरणीसाठी लागणारी आवश्यक बियाणे दुकानदारांकडून खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन खरीप पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यंदा ८६ हजार २२७ हेक्टर वर विविध पिकांचे लागवडीखाली क्षेत्र प्रस्तावित आहे.

यंदा कृषी विभागाकडून खरीप पेरणीचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी देखील खरीप पेरणीसाठी शेतीविषयक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. यावर्षी हवामान खात्याने लवकरच पर्जन्यमान होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

शिवाय शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांसाठी कंबर कसली असून खरीप पेरणीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू केले आहे. यावर्षी तालुक्यात जवळपास ८६ हजार २२७ हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा ऊस, केळी, पपई, मिरची हळद या पिकांच्या लागवडीमध्ये वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बियाणे घेताना काळजी घ्या

दरम्यान, शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामात खते व बियाणे खरेदी करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून लेबल असलेले व सिलबंद बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बिल खरेदी केलेल्या बियाण्याचा संपूर्ण तपशील तपासून घ्यावा. बियाणे खरेदी करताना वैध मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे.

पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणे खरेदीची पावती, वेस्टन बॅग व त्यावरील लेबल टॅग आदी जपून ठेवावे. बियाणे खरेदी करताना संबंधित विक्रेता जर उपरोक्तप्रमाणे संपूर्ण विवरणासहित बिल देत नसेल, मुदतबाह्य बियाण्याची विक्री करीत असेल, छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करीत असेल तर त्याची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, यांच्याकडे लेखी स्वरूपात करावी.

विशेष पथके स्थापन

शेतकऱ्यांची बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून देखील तालुकास्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी संदर्भात कुठल्याही अडचणी किंवा फसगत वाटली तर त्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा. घाई गडबड न करता पेरणी योग्य पाऊस पडल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.

- काशीराम वसावे, तालुका कृषी अधिकारी, शहादा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Maharashtra : पावसाचे ताजे अपडेट, विदर्भ मराठवाड्यासह कोकणात अतिवृष्टी; खानदेशात शेतीपिकांना दिलासा

Farmer Crisis: पीकं हातची जाऊनही विम्याचा आधार नाही; पीकविम्यातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका

CM Fadanvis at Dahihandi: पापाची हंडी फोडली, आता विकासाची हंडी लावणार: मुख्यमंत्री फडणवीस

Bihar Economic Package: बिहारमध्ये १ कोटी तरुणांसाठी रोजगार संधी; नितीश कुमारांनी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले

PM Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा; लातूर परिमंडळ आघाडीवर

SCROLL FOR NEXT