
Vikramgad News : विक्रमगड : तालुक्यातील अनेक भागांमध्ये फुलशेती केली जाते. सद्यस्थितीत मोगरा फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ओंदे ग्रामपंचायतीअंतर्गत खांड येथील जवळ जवळ २०० हून अधिक शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकर तर कुणी अर्धा एकर असे १०० ते १५० एकर क्षेत्रामध्ये मोगरा लागवड केली आहे. सध्या मोगऱ्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असून रोज मोठ्या प्रमाणावर फुले काढली जात आहेत. मोगरा शेतीतून वर्षाकाठी कमीत कमी एक शेतकरी जवळ-जवळ दोन लाखांचे उत्पादन घेत आहे.
निसर्गरम्य व हवामानाच्या दृष्टीने उत्तम; तसेच सुपीक प्रकारची जमीन असलेला विक्रमगड तालुका आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड, तर उन्हाळ्यात कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतली जातात. काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात फुलशेतीची लागवड शेतकरी हिवाळी व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
त्या अनुषंगाने खांड गावातील पुष्प उत्पादक संघातील १५० शेतकरी, तर खांड-खरपडपाडा संघातील ५० अशा एकूण २०० शेतकऱ्यांनी प्रत्येकी आपल्या अर्धा किंवा अधिक एकर शेतामध्ये ५००हून अधिक मोगरा कलमांची लागवड केली आहे. सध्या हिवाळा संपत आल्याने मोगरा कळीचे उत्पादन वाढत आहे. एकदा लागवड केलेली मोगरा कलम जवळ जवळ १५ वर्षे उत्पन्न देते. कलमांसाठी येणारा खर्च अल्प आहे.
आज बाजारात २०० रुपये किलोने विकणारा मोगरा सणावारास एक हजार रुपये प्रति किलो दरानेही विक्री होत असतो. सद्यस्थितीत मोगरा कळी उत्पादन वाढत असून, रोज चार ते पाच किलो कळीचे उत्पादन मिळत आहे. येथील शेतकऱ्यांनी आपला एक संघ तयार केला आहे. उत्पादित मोगरा एकत्र जमा करून तो दादर किंवा नाशिक, गुजरात अशा मोठ्या शहरांकडे पाठवला जातो. वर्षाकाठी कमीत कमी एक शेतकरी जवळ-जवळ दोन लाखांचे उत्पादन घेतो. त्यामुळे मोगरा फुल शेती फायद्याची असल्याचे मत येथील शेतकरी अनिल गोविंद यांनी व्यक्त केली आहे.
२०० ते ३०० रुपये किलोने विक्री
स्थानिक बाजारपेठ आणि सध्या सणवार नसल्याने योग्य भाव मिळत नाही. विक्रमडची मोगरा कळी दादरच्या व नाशिकच्या बाजारात जाते. सध्या फुलांची मागणी असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. त्यात आता मोगऱ्याचा भाव पडलेला आहे. अवघ्या २०० ते ३०० रुपये किलोने विकला जात आहे, अशी माहिती मोगरा उत्पादक काशिनाथ महादू गोविंद यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.