Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ८४ प्रस्ताव मंजूर

Agriculture Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत खंडित कालावधी ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ मधील जिल्ह्यातील एकूण ९४ प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले.

Team Agrowon

Bhandara News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत खंडित कालावधी ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ मधील जिल्ह्यातील एकूण ९४ प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले. त्यापैकी ८४ प्रस्ताव मंजूर होऊन ८३ प्रस्तावांचा निधी जिल्हास्तरावर प्राप्त झालेला आहे.

जिल्ह्यात काही बिगर शासकीय व्यक्ती शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करून अर्ज मंजूर करून आणण्याची हमी देतात. मात्र, सदर योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते असून अर्ज करणे, अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रिया दरम्यान कोणत्याही बिगर शासकीय व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज मंजूर करून देण्याच्या कोणत्याही आमिषास बळी न पडता कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन योजनेत अर्ज करावा.

त्यासाठी कोणतीही फी अदा करू नये, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी कळविले आहे. सन २०२३-२४ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू झालेली आहे. अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी अनुदानाचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसांत सादर करावा.

प्रस्ताव तयार करताना येणाऱ्या अडचणींविषयी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा शेतकरी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे आठ दिवसांत सादर करतात. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून छाननी झालेल्या प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT