Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : करपरामध्ये ८२ टक्के, तर मासोळीत ४७ टक्के जलसाठा

Water Dam Update : करपरा (निवळी, ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात २४.९०० पैकी २०.३३३ दलघमीनुसार ८२ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये २७.१४१ पैकी १२.७३७ दलघमीनुसार ४७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. ८) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा (निवळी, ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात २४.९०० पैकी २०.३३३ दलघमीनुसार ८२ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये २७.१४१ पैकी १२.७३७ दलघमीनुसार ४७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पांत मिळून सरासरी ५२.०४१ पैकी ३३.०६७ दलमघी नुसार ६४ टक्के जलसाठा जमा झाला.

करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून, त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ३४.०८५ दलघमी असून, त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.

गुरुवारी (ता. ८) प्रत्यक्षात करपरा प्रकल्पात २०.३३० दलघमी म्हणजेच ८२ टक्के, तर मासोळी धरणामध्ये १२.७३७ दलघमी म्हणजेच ४७ टक्के उपयुक्त जलसाठा जमा झाला होता. मागील गुरुवारी (ता. १) करपरा मध्यम प्रकल्पात १५.०८५ दलघमीनुसार ६१ टक्के, तर मासोळीमध्ये ९.९४५ दलघमीनुसार ३७ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी ८ ऑगस्ट रोजी करपरा मध्यम प्रकल्पांत ५.३९३ दलघमी (२१ टक्के), तर मासोळी मध्यम प्रकल्पात ४.९७८ दलघमी (१८ टक्के) जलसाठा उपलब्ध होता.

लघू प्रकल्पांमध्ये ३१ टक्के जलसाठा...

परभणी जिल्ह्यातील २२ लघू सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी, तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. गुरुवारी (ता. ८) घेतलेल्या नोंदीनुसार २० लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १२.९३९ दलघमीनुसार ३२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. तांदूळवाडी (ता. पालम), कोद्री (ता. गंगाखेड), बेलखेडा (ता. जिंतूर) हे ३ लघू तलाव १०० टक्के भरले आहेत. झरी (ता. पाथरी) तलावात ९ टक्के,

नखातवाडी (ता. सोनपेठ) तलावात १ टक्का, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलवामध्ये ४५ टक्के, टाकळगाव तलावात प्रत्येकी ३६ टक्के, पिंपळदरी तलावात ३५ टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ३ टक्के, जोगवाडा तलावात ५२ टक्के, वडाळी तलावात २३ टक्के, चारठाणा तलावात १८ टक्के, चिंचोली तलावात १६ टक्के, आडगाव तलावात १७ टक्के, केहाळ तलावात ३० टक्के,

भोसी तलावात ५८ टक्के, कवड तलावात ३ टक्के, मांडवी तलावात ३१ टक्के, दहेगाव तलावात ३ टक्के, पाडाळी तलावात ५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु पेडगाव (ता. परभणी) व आंबेगाव (ता. मानवत) या २ तलावातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. मागील आठवड्यात लघू प्रकल्पात १०.३९८ दलघमी पाणीसाठा होता. गतवर्षी ८ ऑगस्ट रोजी लघू तलावांमध्ये सरासरी ४.४२८ दलघमी (१० टक्के) पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT