Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सांगलीत ८० गावे पाणी टंचाईग्रस्त

Water Shortage : सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. सध्या ऐंशी गावे टंचाईग्रस्त आहेत. ७३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, दौड लाखांवर लोकसंख्या बाधित आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. सध्या ऐंशी गावे टंचाईग्रस्त आहेत. ७३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, दौड लाखांवर लोकसंख्या बाधित आहे. जत व आटपाडी तालुक्यांतील ही गावे असून कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यांत ४ गावे टंचाईग्रस्त आहेत. तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

जिल्ह्यात जुलै महिना वगळता जून, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. यंदा सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याचा फटका जत आणि आटपाडी तालुक्यांतील गावांना बसला आहे.

तेथे नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून ७३ गावे व ५२९ वाड्यांना गावांना ७५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने डिसेंबरमध्येच ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

त्या वेळीच ऐन उन्हाळ्यात टंचाई तीव्र होणार, अशी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर तीन महिन्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे. पावसाळ्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. यादरम्यान टंचाई तीव्र होणार आहे.

जत तालुक्यात ६८ गावे टंचाईग्रस्त

जत तालुक्यातील ६८ गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ६५ गावांना तसेच ४७९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील एक लाख ४६ हजार ६८४ लोकसंख्या टंचाईने बाधित झालेली आहे. आटपाडी तालुक्यातील ८ गावे व ५० वाड्या टंचाईग्रस्त असून त्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यातील १२ हजार ७४२ लोकसंख्या टंचाईने बाधित आहे. जत तालुक्यात ६६ तर आटपाडी तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एक गाव टंचाईग्रस्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT