Water Shortage : जळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २२ गावांना २६ टँकरने पाणी

Water Crisis : जळगाव जिल्ह्यात तापमानासोबत टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत आहे. २२ गावांना २६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
Water Tanker
Water TankerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात तापमानासोबत टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत आहे. २२ गावांना २६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असून, पालिका, नगर परिषदांना पाणीकपातीचे व पुरवठ्याच्या दिवसात वाढ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ८० टक्के साठा असल्याने जळगावकरांना पाण्याची चिंता नसल्याची चिन्हे आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नसली तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यात १७ गावांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आठवड्यात सहा टॅकर वाढले आहेत. चाळीसगाव दुष्काळी घोषित झाला आहे. अमळनेर, पारोळा,भडगाव भागात पाण्याची समस्या बिकट आहे. चाळीसगाव, भडगाव भागातील अनेक मंडल, गावे दुष्काळी स्थितीत आहेत. टंचाईला तोंड देण्यासाठी आतापर्यंत १२ गावातील १४ ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

Water Tanker
Water Shortage : पाझर तलाव, बंधारे पडले कोरडेठाक

चाळीसगावचा मन्याड मध्यम प्रकल्प कोरडा आहे. एरंडोल मधील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतही जलसाठा जेमतेम आहे. सर्वात मोठ्या गिरणा धरणात साठा ४० टक्क्यावर असल्याने गिरणा पट्टा दुष्काळाच्या छायेत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठा १३.३६ टक्क्यांनी कमी आहे. जलसाठा घटत आहे. याचाही फटका रब्बीला जसा बसला, तसाच फटका पाणीपुरवठा योजनांनाही बसत आहे. रावेर तालुक्यातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यामुळे या भागात जलसंकट तुलनेने कमी आहे.

Water Tanker
Dams Water Kolhapur : शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणी कोल्हापूरच्या धरणांची अशी आहे स्थिती?

टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारी गावे

चाळीसगाव- विसापूर तांडा, अंधारी, करजगांव, कृष्णानगर, हातगांव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगांव, हातगांव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रूक प्र.दे, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगांव, भडगाव तालुका- तळबंद तांडा, अमळनेर तालुका -तळवाडे, शरसाळे बुद्रुक

भुसावळला ८ दिवसांआड पाणी

जिल्ह्यात १ ते ८ दिवसाआड पाणी पुरवठा महापालिका, नगरपालिका करीत आहेत.भुसावळला ८ दिवसाआड, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव एक दिवसाआड, चाळीसगाव चार, जामनेर तीन, अमळनेर पाच, बोदवड पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

यंदा कडक उन्हाळा असल्याने पाणी टंचाईची गावेही वाढतील. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे नियेाजन केले आहे. अनेक गावांत टँकर सूरू आहेत. काही गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. नगरपालिका, नगरपरिषदांना पाणी कपातीचे आदेश दिले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com