Brinjal Production agrowon
ॲग्रो विशेष

Brinjal Production : सोळा गुंठ्यांत ८० हजारांची वांगी उत्पन्न, कोल्हापूरच्या अमृत पाटील यांची प्रयोगशील शेती

Brinjal Production Kolhapur : अमृत पाटील या युवा शेतकऱ्याने ऊस शेतीला पर्याय म्हणून पुन्हा वांगी उत्पादनाचा मार्ग स्वीकारला आहे.

sandeep Shirguppe

Farmer Brinjal Production : शेतीत आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करत दुर्गम चंदगड तालुक्यातील एका शेतकऱ्यांने अवघ्या १६ गुंठ्यात वांग्याचे ८० हजार रुपयांचे उत्पादन घेत नवा आदर्श समोर ठेवला आहे. कल्याणपूर (ता. चंदगड) येथील अमृत पाटील या शेतकऱ्याचे नाव आहे. अद्याप वांग्याचा फड अजून महिनाभर चालेल असे अमृत पाटील यांचे म्हणणे आहे. या कालावधीत एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. उत्पादीत वांगी कल्याणपूर वांगी या नावाने ते बेळगाव मार्केटमध्ये विकत पाटील यांनी विक्री केली आहे.

कल्याणपूरच्या मातीत वांग्याचे पीक चांगल्या प्रकारे येते. येथे पिकलेल्या वांग्यांना विशिष्ट प्रकारची चव आहे. वांगी उत्पादनाचे गाव म्हणून गावाची खरी ओळख आहे. अलीकडे पाण्याची सोय झाल्याने बहुतांश शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे वांगी उत्पादनाचे क्षेत्र कमी झाले आहे. अमृत पाटील या युवा शेतकऱ्याने ऊस शेतीला पर्याय म्हणून पुन्हा वांगी उत्पादनाचा मार्ग स्वीकारला आहे.

कुटुंबीयांच्या मदतीने यावर्षी त्यांनी १६ गुंठे जमिनीत मांजरी जातीच्या वांग्याच्या रोपांची लावण केली आहे. नांगरट व कोळपणी झाल्यानंतर शेणखत टाकून गादीवाफ्यावर १ डिसेंबरला रोपांची लावण केली. १५ दिवसांतून एक वेळ पाणी दिले. तीन हजार रोपे तयार झाली आहेत.

महिनाभरापासून वांग्यांची काढणी सुरू केली आहे. काढलेल्या वांग्यांची बेळगाव मार्केटमध्ये घाऊक किमतीने विक्री केली जात आहे. कल्याणपूर वांगी या नावाने ते वांग्यांची विक्री करत असल्याने मागणी चांगली आहे. उत्पादन खर्च अत्यल्प असून आतापर्यंत ८० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. वांग्यांची आठवड्यातून दोन वेळा काढणी केली जाते.

वांग्यांची लावण मोठ्या प्रमाणावर असल्याने अजून महिनाभराचा कालावधी असल्याने अंदाजे लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. केवळ १६ गुंठ्यांत लाखोंचे उत्पन्न मिळवून अमृत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर भाजीपाला उत्पादनाचा नवा आदर्श ठेवला आहे.

ऊस पिकाचा वाढता उत्पादन खर्च, रोगराई, पाण्याची समस्या यांचा विचार केला तर उसाची शेती करणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ऊस शेतीला पर्याय म्हणून वांगी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतीत थोडे कष्ट जास्त असले तरी चांगले उत्पन्न मिळते. मला १६ गुंठे जमिनीत वांग्यापासून आतापर्यंत ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. अजून तोडणी सुरू असल्याने अंदाजे लाखाचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.

-अमृत पाटील, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT